आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आश्रमशाळेत शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी शिक्षक गजाआड

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेणाऱ्या दहावीतील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या शिक्षकाला घारगाव पोलिसांनी अटक केली. पठार भागातील जवळेबाळेश्वर येथील मामेखेलच्या आश्रमशाळेत हा प्रकार घडला. संबधीत शिक्षकाने विद्यार्थीनीस घरात बंद करुन तिच्यावर अत्याचार केल्याची पीडित मुलीची तक्रार आहे. 


सतरा वर्षीय विद्यार्थीनी या शाळेत शिक्षणासाठी असून तीच्यावर   अत्याचाराची घटना २१ मार्चला घडली. पहिलीपासून शिक्षणासाठी ही विद्यार्थीनी या आश्रमशाळेत राहते. शाळेतील विज्ञान शिक्षक जयराम गाेडे वारंवार तिची छेडछाड करत असे. भितीमुळे तीने हा प्रकार सांगितला नाही. २१ मार्चला पेपर झाल्यानंतर शिक्षक गोडे यांनी तिला विज्ञानाच्या प्रकल्पाची फाईल घेऊन आपल्या घरी मामेखेल येथे बोलावले होते. सायंकाळी पाचच्या सुमारास ती गोडे यांच्या घरी गेल्यावर त्यांनी घराच्या दरवाजाला आतून कडी लावून घेत तिच्या तोंडात रुमालाचा बोळा कांेबत तिच्यावर अत्याचार केले. त्यानंतर सुट्टीसाठी घरी गेलेल्या या विद्यार्थीनीस २२ मार्चला गोडे याने दोन-तीनदा तिच्या मोबाईलवर फोन केले. घडल्या प्रकाराविषयी कोणालाही काही सांगू नये अशी धमकी दिली. हे फोन कॉल तिने रेकार्ड करुन ठेवले. घरच्यांनी शिक्षकाविषयी विचारणा केली असता तिने २१ मार्चला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर शिक्षकाविरोधात घारगाव ठाण्यात तक्रार देण्यात आली. 

बातम्या आणखी आहेत...