आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उसने पैसे न दिल्याने मित्राकडून खून; अहमदनगर तालुक्यातील अरणगाव भागातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- उसने पैसे न दिल्याने एका मित्राने आपल्याच मित्राचा दगडाने ठेचून खून केल्याची घटना अरणगाव (ता. नगर) येथे उघडकीस आली. या प्रकरणी नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. 


केडगाव येथील मोहिनीनगरमध्ये राहणार राहुल निमसे व याच भागातील अमित खामकर हे दोघे मित्र नागापूर एमआयडीसीत कंत्राटी कामगार म्हणून साफसफाईचे काम करत. राहुल एका हाताने अपंग होता. त्याच्याकडे अमित उसन्या पैशांची मागणी करत होता. राहुलची परिस्थिती हलाखीची असल्याने त्याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे या दोघांमध्ये काही दिवसांपासून वाद सुरु होते. याच वादातून अमितने राहुलच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून केला. नंतर त्याचा मृतदेह अरणगाव शिवारातील मेहेराबादजवळ फेकून दिला. 


याप्रकरणी राहुलचा भाऊ राजू निमसे यांच्या फिर्यादीवरुन पोलिसांनी अमितवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, राहुरी तालुक्यातील वळण रस्त्यावर शुक्रवारी एका महिलेचा मृतदेह आढळला. गळा आवळून खून करून मृतदेह झुडपांत फेकून दिला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. 

बातम्या आणखी आहेत...