आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्नीला ठार मारून मृतदेह घराशेजारी पुरला; चारित्र्याच्या संशयावरून कृत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
घराशेजारी पुरलेला हिराबाई जाधव हिचा मृतदेह पोलिस बंदोबस्तात बाहेर काढण्यात आला. यावेळी मोठा जमाव जमला होता. - Divya Marathi
घराशेजारी पुरलेला हिराबाई जाधव हिचा मृतदेह पोलिस बंदोबस्तात बाहेर काढण्यात आला. यावेळी मोठा जमाव जमला होता.

पाथर्डी- चारित्र्याच्या संशयावरून शिरपूर येथील रमेश जाधव याने लाकडी दांडक्याने मारहाण करून आपली पत्नी हिराबाई (४५) हिचा निर्घृण खून करून पुरावा नष्ट करण्यासाठी घराशेजारीच मृतदेह पुरला. पोलिसांनी आरोपीला अटक केली. 


आरोपीच्या भावाने मृत महिलेच्या भावाला फोन करून घडलेला प्रकार सांगितला. तालुक्यातील कुत्तरवाडी येथून मृत महिलेचे कुटुंबीय शिरपूर येथे निघाले. झोपडपट्टीतील जाधवच्या घरी पोहोचण्यापूर्वीच पोलिस आले होते. घरातील कपड्यांवर रक्त पडलेले होते. छपरातील लाकडी दांड्याला रक्त लागले होते. पोलिसांनी आरोपीकडे चौकशी केली असता पत्नीचा खून करून मृतदेह पुरल्याचे त्याने सांगितले. घराच्या बाजूस मोकळ्या जागेत मृतदेह पुरलेली जागा त्याने दाखवली. खड्ड्यातून मृतदेह बाहेर काढण्यात आला. मृत हिराबाईच्या अंगावर मारहाणीचे वळ होते. डोक्यावर जखमा होत्या. 


प्रशिक्षणार्थी उपअधीक्षक पौर्णिमा बांदल, निरीक्षक राकेश माणगावकर, सहायक निरीक्षक यशवंत राक्षे, उपनिरीक्षक पुंडलिक पावसे व वैभव पेठकर आदींनी घटनास्थळी भेट दिली. 

बातम्या आणखी आहेत...