आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसापूर खुल्या कारागृहातून खुन प्रकरणातील कैदी पळाला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोंदे- तालुक्यातील विसापूर येथील खुल्या कारागृहात खुनाच्या गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला आरोपी महेश ऊर्फ बाळू शिवाजी चव्हाण (मुंबई) याने सोमवारी सकाळी सहाच्या सुमारास लोखंडी पट्टीच्या गेटवरून उडी मारून पलायन केले. हेड कॉन्स्टेबल जगन्नाथ गणपत भोसले यांनी सकाळी आरोपींना नाश्त्यासाठी बाहेर काढले. 


आरोपी चव्हाणने चहा-नाष्टा घेतला. नंतर लघुशंकेसाठी तो स्वच्छतागृहांकडे गेला. त्याने तेथील लोखंडी गेटच्या कंपाउंडवरून उडी मारून पलायन केले. पोलिस शिपाई गोटीराम शांताराम पवार याने आरोपीस पलायन करताना पाहिले. त्यांनी अारडाअाेरड केल्यानंतर अन्य पोलिस कर्मचाऱ्यांनी तिकडे धाव घेत शेजारी असलेल्या उसाच्या शेतात आरोपीचा शोध घेतला, परंतु तो सापडला नाही.

बातम्या आणखी आहेत...