आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाचे ६१९ कोटींचे अंदाजपत्रक, आज होणार सविस्तर चर्चा, वालगुडेंवर आयुक्त झाले संतप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - शहराचा चेहरा मोहरा ठरवणारे २०१८-२०१९ मधील ६१९ कोटी रुपयांचे मुळ अंदाजपत्रक आयुक्त घनशाम मंगळे यांनी सोमवारी स्थायी समितीसमोर सादर केले. पारंपरीक तरतुदींनाच पुन्हा उत आल्याचे चित्र या अंदाजपत्रकात दिसून येते. या अंदाजपत्रकात सीना नदीपात्रातील हद्द निश्चिती व अतिक्रमणे काढण्यासाठी ९० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. त्याबरोबरच रक्तविघटन प्रयोगशाळेसाठीही ८० लाखांची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, सोमवारी सादर केलेल्या अंदाजपत्रकाला उशिर झाल्याचा आक्षेप स्थायी समितीच्या सदस्यांनी घेतल्याने मंगळवारी (२० मार्च) अंदाजपत्रकारव चर्चा केली जाणार आहे. 

 

आयुक्त मंगळे यांनी अंदाजपत्रक सभापती सुवर्णा जाधव यांच्याकडे सुपूर्त करून चर्चेसाठी ठेवले. यावेळी नगरसेवक बाबासाहेब वाकळे, दत्ता कावरे, समद खान, संजय शेंडगे, उषा नलावडे, अनिता राठोड, प्रभारी उपायुक्त एस. बी. तडवी, मुख्य लेखाधिकारी दिलीप झिरपे, मुख्यलेखा परीक्षक चंद्रकांत खरात आदी उपस्थित होते. सभा सुरू होताच नगरसेवक बाबासाहेब वाकळे यांनी आक्षेप नोंदवला. अंदाजपत्रक सादर करण्यास उशिर का झाला ? आम्हाला अभ्यासासाठी वेळ हवा आहे. त्यावर आयुक्त मंगळे यांनी अंदाजपत्रकाला उशीर झाल्याचे मान्य केले. काही महिन्यांपासून पथदिवे प्रकरणी अधिकारी कार्यालयात नव्हते, लेखाधिकारी, दोन उपायुक्त नसल्याने अर्थसंकल्पास उशिर झाला. स्थायीला व महासभेला चर्चेसाठी वेळ अपुरा असल्याच्या भावनेशी सहमत असल्याचे मंगळे यांनी मान्य केले. मंगळे म्हणाले, सादर केलेले २०१८-२०१९ वर्षातील अंदाजपत्रक ६१९ कोटींचे आहे. महसुली उत्पन्न ३१५ कोटी, भाजवली जमा २६३ कोटी ७९ लाख गृहीत धरण्यात आले आहे. महसुली उत्पन्नात संकलीत कराकोटी ५५ कोटी, शास्ती पोटी ४८ कोटी, जीएसटी अनुदान ८५ कोटी आदी बाबींसह २२६ कोटी ५५ लाख असेल. भांडवली कामांवर अनुदान, कर्ज व मनपा हिस्सा असे ३५३ कोटी १० लाख अंदाजीत खर्च होणार आहे. 


दरम्यान, वाकळे यांनी सभेला अिधकारी गैरहजर रािहल्याबाबत विचारणा केली. त्यावर मंगळे म्हणाले, अधिकाऱ्यांचा रजेचा अर्ज नामंजूर केला. सभापती जाधव म्हणाल्या, आयुक्तांनी सादर केलेल्या अंदाजपत्रकावर मंगळवारी (२० मार्च) साडेअकरा वाजता सभा सुरू होईल. सर्व अधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे. 


मुतारीसाठी २ लाख 
शहरात सार्वजनिक स्वच्छतागृह व मुताऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे. वारंवार याबाबत नागरिकांकडून आवाज उठवण्यात आला. महिलांसाठी बोटावर मोजण्याइतकीच स्वच्छतागृहे आहेत. परंतु, मुतारी दुरुस्ती नवीन मुतारी बांधणे हा प्रश्न ऐरणीवर असताना यासाठी अवघी २ लाख तरतूद करण्यात आली. 


अंदाजपत्रक (तरतूद लाखांत) 
 डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा - २० 
 महात्मा फुले पुतळा - २० 
 रक्तविघटन प्रयोगशाळा - ८० 
 सीना अतिक्रमण हटवणे - ९० 
 स्मशानभुमी - ३० 
 ओढे, नदी, अतिक्रमण - २२ 
 मुतारी दुरुस्ती व नवीन - २ 
 शहरबससेवा - ६० 
 कचरा डेपो जागा खरेदी - ० 
 सभांचे चहापान - ४ 

बातम्या आणखी आहेत...