आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाचे कार्यालय नगरमध्ये सुरू, विकासकाचा वाढणार वेग

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

प्रतिनिधी. नगर-केंद्रीय महामार्ग मंत्रालयाचे कार्यालय नगरमध्ये सुरू झाले असून, या कार्यालयामुळे जिल्ह्यातील विकास कामांचा वेग वाढणार, असा विश्वास खासदार दिलीप गांधी यांनी मंगळवारी व्यक्त केला. 

 

नगर शहरातील जिल्हा मजूर फेडरेशनच्या इमारतीत केंद्र सरकारच्या सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाचे कार्यालय नगरला कार्यान्वित झाले अाहे. या कार्यालयाचे उद््घाटन गांधी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण, गटनेते सुवेंद्र गांधी, मजूर फेडरेशनचे संचालक झुंबर पवार, सचिव विठ्ठल सांगळे, उपव्यवस्थापक प्रकाश कराळे, विजय रासकर, तुकाराम बोरुडे, अभियंता राजगुरु, संग्राम म्हस्के, नेवासे भाजप तालुकाध्यक्ष दिनकर गर्जे यावेळी उपस्थित होते. 


गांधी म्हणाले, नगरमधील सर्व महामार्ग राष्ट्रीय महामार्गात वर्ग करण्यात व या सर्व महामार्गांच्या विकासाकरिता करोडो रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी मोलाची साथ दिली. नगरमधून जाणारे सर्व नऊ महामार्ग आता सहापदरी होणार आहेत. यासाठी सातत्याने मंत्रालयात पाठपुरावा केल्याने काही दिवसांपूर्वी मंत्री नितीन गडकरी यांनी प्राधान्याने या कार्यालयास परवानगी दिली. त्यामुळे अधिकाऱ्यांना देखील आता मुंबई, औरंगाबाद, नाशिकला जाण्याची गरज पडणार नाही. त्यामुळे वेळ व पैसाही वाचणार आहे. आता नगरला हे कार्यालय सुरू झाल्याने विकास कामांचा वेगही वाढणार आहे, असे त्यांनी सांगितले. 

 

पुढे ते म्हणाले, ज्या गावाचे रस्ते विकसित झालेले असतात, तेथे प्रगती होत असते. नगरसाठी २०१८ वर्षे हे मोठे बदल घडवणारे ठरणार आहे. रस्ते विकास मंत्रालयाचे कार्यालय नगरला सुरू होण्यासाठी प्रकल्प संचालक दिवाण यांनी सहकार्य केले. 


कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात प्रफुल्ल दिवाण म्हणाले, खासदार दिलीप गांधी यांच्या अथक प्रयत्नाने व दिल्लीतील पाठपुराव्यामुळे नगरला हे महत्त्वाचे कार्यालय कार्यान्वित झाले आहे. 

यापूर्वी सातत्याने अधिकाऱ्यांना औरंगाबाद, नाशिकला जावे जागत असे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वेळ खर्च होत असे. आता नगरलाच हे कार्यालय कार्यान्वित झाले असल्याने मोठ्या प्रमाणात कामांचा वेग वाढणार आहे. नगरचे अनेक मोठे प्रकल्प, प्रगतिपथावर आहेत. ही सर्व कामे लवकरच प्रत्यक्षात सुरू होणार आहेत, असा विश्वास प्रफुल्ल दिवाण यांनी यावेळी व्यक्त केला. 

 

नगर शहरातील जिल्हा मजूर फेडरेशनच्या इमारतीत केंद्र सरकारच्या सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाच्या कार्यालयाचे उद््घाटन करताना खासदार दिलीप गांधी. समवेत प्रकल्प संचालक प्रफुल्ल दिवाण, गटनेते सुवेंद्र गांधी, मजूर फेडरेशनचे संचालक झुंबर पवार, सचिव विठ्ठल सांगळे, उपव्यवस्थापक प्रकाश कराळे अादी.

 

उड्डाणपूल व बाह्यवळण रस्त्याच्या कामांना येणार गती 
नगर शहरातील उड्डाणपुल, बाह्यवळण रस्ता ही कामे केंद्रीय रस्ते विकास मंत्रालयाने मंजूर केलेली आहेत. ही सर्व कामे लवकरच सुरू व्हावीत, तसेच सर्व प्रशासकीय तरतुदी लवकरात लवकर पूर्णत्वास याव्यात, यासाठी नगर शहरात राष्ट्रीय महामार्ग मंत्रालयाचे कार्यालय होणे गरजेचे होते. ते आता सुरू झाले, असे खासदार दिलीप गांधी यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...