आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांच्या हत्याकांडाच्या मुख्य सुत्रधाराला अटक, पूर्ववैमनस्यातून घडवली हत्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- जामखेडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन कार्यकर्त्यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी मुख्य सूत्रधार उल्हास माने याला अटक केली आहे. प्रकरणात सुरूवातीला हल्लेखोर गोविंद गायकवाड याच्यासह एका अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली होती. तसेच पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

 

जामखेड शहरातील एका हॉटेलमध्ये 28 एप्रिलच्या संध्याकाळी हे हत्याकांड घडले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस योगेश राळेभात आणि राकेश उर्फ रॉकी अर्जुन राळेभात हे दोघे त्या हॉटेलमध्ये असताना या दोघांवर दुचाकीवरुन आलेल्या तिघांनी गोळीबार करण्यात आला होता. यात योगेश आणि राकेश या दोघांचाही मृत्यू झाला होता. राकेशने मृत्युपूर्वी गोविंद गायकवाडने हा गोळीबार केल्याचे सांगितले होते. पोलिसांनी गोविंद गायकवाडसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला होता.

 

मानेच्या तालमीतील पैलवानांशी झाला होता वाद 
उल्हास माने हा भाजपा नेते आणि पालकमंत्री राम शिंदे यांचा कार्यकर्ता आहे. वर्षभरापूर्वी माने याच्या तालमीतील मुलांशी फलक लावण्याच्या कारणावरून योगेश व राकेशचा वाद झाला होता. त्यातूनच हे हत्याकांड घडले असून मानेच्या तालमीतील पैलवानांनीच ही हत्या केल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी गोविंद गायकवाड सह एका अल्पवयीन मुलाला पुणे जिल्ह्यातील मांडवगण फराटा येथून अटक करण्यात आली होती. त्यानंतर माने याच्या अडचणीत वाढ होणार असल्याचे बोलले जात होते. शेवटी आज पोलिसांनी मानेला अटक केली. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 9 जणांना अटक करण्यात आली आहे.

 

बातम्या आणखी आहेत...