आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवविवाहितेची आत्महत्या; बंदोबस्तात अंत्यसंस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राहाता - सव्वा वर्षापूर्वी विवाह झालेल्या विवाहितेने सासरच्या छळास कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सकाळी ८ च्या सुमारास पाथरे येथे घडली. विवाहितेला मारहाण करून तिला विहिरीत टाकल्याचा आरोप नातेवाईकांनी करत गोंधळ घातल्याने वातावरण तणावपूर्ण झाले. मोठ्या पोलिस बंदोबस्तात विवाहितेवर सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

 

कांचन राकेश कडू (वय २३) असे मृत विवाहितेचे नाव आहे. तिचा विवाह पाथरे येथील राकेश कडू याच्याबरोबर २३ मे २०१७ रोजी झाला होता. कांचन सासरी नांदत असताना तिला सासरच्या लोकांनी मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. १ जूनला कांचनला मुलगा झाला. सव्वा महिन्याचा मुलगा वारल्याने सासरच्या लोकांनी आणखी छळण्यास सुरूवात केली. या छळाला कंटाळून कांचनने घरामागील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. बुधवारी सकाळी ही घटना नातेवाईकांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सासरच्या लोकांनी तिला मारून विहिरीत टाकल्याचा आरोप नातेवाईकांना करून गोंधळ घातला. पोलिसांनी तातडीने परिस्थिती नियंत्रणात आणली. शवविच्छेदन लोणी येथे करण्यात आले. पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचा अहवाल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिला. सासरच्या घरासमोर पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याची व सासरच्या लोकांना अटक केल्याशिवाय अंत्यविधी केला जाणार नाही अशी भूमिका नातेवाईकांनी घेतल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते. पोलिसांनी नातेवाईकांची समजूत काढल्याने वातावरण निवळले. घराशेजारी मोकळ्या जागेत अंत्यसंस्कार करण्यात आले. कांचनचा भाऊ किरण चांगदेव कदम यांनी दिलेल्या फिर्यादीवरून लोणी पोलिसांनी तिचा पती राकेश रामदास कडू,सासू विजया, सासरा रामदास,दीर विरेश,भाया रविराज, जाव ज्योती या सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल केला.

बातम्या आणखी आहेत...