आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगवानगड, गोपीनाथगडचा दुरावा संपवण्‍यासाठी स्‍व. मुंडे यांच्‍या जयंतीनिमीत्‍त मशाल यात्रा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी- गोपीनाथ मुंडे यांच्या ६८ व्या जयंतीनिमित्त सोमवारी भगवानगड ते गोपीनाथगड मशाल यात्रा निघणार आहे. ही यात्रा १२ डिसेंबरला सकाळी गोपीनाथगडावर पोहोचेल. भगवानगडावरून आलेल्या ज्योतीने गोपीनाथगडावरील कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन होईल, अशी माहिती मुख्य संयोजक राहुल कारखेले यांनी दिली. 


ते म्हणाले, भगवानबाबांवर जेवढे समाजाचे प्रेम होते, तेवढेच प्रेम गोपीनाथ मुंडे यांच्यावर केले. मुंडे यांच्या उपकाराची उतराई समाजाकडून कधीही होणार नाही. त्यांच्या शिकवणीनुसार काम करण्याची प्रेरणा सतत मिळावी, यासाठी मशाल यात्रेचे आयोजन केले आहे. ज्या तरुणांना यात्रेत सहभागी व्हायचे आहे, त्यांनी सोमवारी सकाळी भगवानगडावर यावे. असे अावाहन करण्यात अाले अाहे.  


नामदेवशास्त्री यांनी भगवानगडावर भाषणबंदीचा निर्णय अमलात आणल्यानंतर पंकजा मुंडे यांच्याकडे वारसा म्हणून चालत आलेला दसरा मेळावा भगवानबाबांच्या जन्मगावी घेण्यात अाला.  या घटनेने भगवानगड ते गोपीनाथगडात निर्माण झालेला दुरावा   मशाल यात्रेने कमी करण्याचा कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे.  

बातम्या आणखी आहेत...