आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगतापसह 5 जणांच्या पोलिस कोठडीत वाढ, आरोपी गुंजाळची पोलिसांच्या विराेधात तक्रार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - केडगाव दुहेरी हत्याकांडाच्या तपासाला गती मिळाली असली, तरी हत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. अटकेत असलेले आमदार संग्राम जगताप यांच्यासह पाच जणांच्या पोलिस कोठडीत १६ पर्यंत वाढ करण्यात आली.

 

दरम्यान, पोलिस मारहाण करून त्रास देत असल्याची तक्रार आरोपी संदीप गुंजाळने गुरूवारी न्यायालयाकडे केली. हत्याकांड प्रकरणी आतापर्यंत ६ जणांना अटक करण्यात आली आहे. हत्या कोणत्या कारणातून करण्यात आली, याबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

 

शिवसेनेचे केडगाव शहर उपप्रमुख संजय कोतकर व कार्यकर्ते वसंत ठुबे यांच्या हत्येप्रकरणी ३२ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ६ आरोपींना अटक करण्यात आली आहे. आमदार संग्राम जगताप, अरुण जगताप, शिवाजी कर्डिले, भानुदास कोतकर, संदीप कोतकर यांच्या विरोधात भादंवि कलम १२० ब अंतर्गत हत्येचा कट रचल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार संग्राम यांना हत्या घडली त्याच दिवशी (७ एप्रिल) अटक करण्यात आली.

 

आरोपी गुंजाळने पारनेर पोलिस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर बाळासाहेब कोतकर व भानुदास कोतकर ऊर्फ बीएम यांनाही पोलिसांनी अटक केली. गुंजाळला गावठी कट्टा पुरवणारा बाबासाहेब केदार यालाही पोलिसांनी अटक केली. जगताप, गुंजाळ, कोतकर व बीएम यांची पोलिस कोठडी संपल्यानंतर गुरूवारी सायंकाळी न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत १६ पर्यंत वाढ केली. केदार यालाही १६ पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. इतर आरोपींची नावे पोलिसांना मिळाली आहेत.

 

शिवसेना कार्यकर्ते मोकाटच : पोलिस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणी ४० पेक्षा जास्त जणांना अटक करण्यात अाली आहे. सीसीटीव्ही फुटेज तपासून अनेकांना ताब्यात घेण्यात येत आहे. तोडफोड करणाऱ्या अनेकांनी शहर सोडले आहे. पोलिस दररोज पाच-सहा जणांना अटक करत आहेत. पोलिसांवर दगडफेक केल्याप्रकरणी शिवसेना उपनेते अनिल राठोड यांच्यासह ६०० जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. हे आरोपी मात्र उजळ माथ्याने फिरत आहेत.

 

कर्डिलेंच्या कोठडी तिसऱ्यांदा वाढ
पोलिस अधीक्षक कार्यालय तोडफोडप्रकरणी २५० जणांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. त्यापैकी ४० जणांना अटक करण्यात आली. त्यात भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांचाही समावेश आहे. कर्डिले स्वत:हून भिंगार कॅम्प पोलिस ठाण्यात हजर झाले. न्यायालयाने त्यांना एका दिवसाची कोठडी सुनावली. मंगळवारी न्यायालयाने त्यांच्या कोठडीत पुन्हा दोन दिवसांची वाढ केली. गुरूवारी तिसऱ्यांदा एका दिवसाची वाढ करण्यात आली.

 

बातम्या आणखी आहेत...