आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूउपशाच्या विरोधात आपधूपकर सरसावले; वाघुंडे, रुईछत्रपती छुप्या पद्धतीने वाळूउपसा जोरात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- अवैध वाळू उपशाला विरोध करण्यासाठी आपधूप येथील ग्रामस्थ एकवटले आहेत. वाळूमाफियांवर कठोर कारवाईची मागणी करणारा ठराव ग्रामस्थांनी मंजूर केला.

 
तालुक्यातील हंगा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणावर अवैध वाळूउपसा केला जातो. त्यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण झाला आहे. वाळूउपसा असाच चालू राहिल्यास पाणीटंचाईचा मोठा प्रश्न भविष्यकाळात उद््भवू शकतो. त्यामुळे आपधूप येथील ग्रामस्थ वाळूउपशा विरोधात सरसावले अाहेत. नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत वाळूउपसा करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसा ठरावदेखील करण्यात आला. वाळूउपसा प्रतिबंधक समितीची स्थापना करण्यात आली आहे. आपधूपकरांनी विरोध केला असला, तरी हंगा नदीवरील वाघुंडे, रुईछत्रपतीमध्ये छुप्या पद्धतीने वाळूउपसा सुरू आहे. 


आपधूप हे गाव दुष्काळीपट्ट्यात वसले असून या गावाने टंचाईच्या तीव्र झळा सोसलेल्या आहेत. माजी सरपंच जयसिंग गवळी ग्रामस्थांच्या विशेष प्रयत्नाने आणि शासनाच्या विविध निधीतून हंगा नदीवर चार मोठे साठवण बंधारे, तसेच दोन मोठ्या ओढ्यांवर सात साठवण बंधारे, दोन मोठ्या ओढ्यांवर सात साठवण साखळी बंधारे निर्माण झाल्याने गावात मोठा पाणीसाठा निर्माण होऊन गाव पाणीदार झाले. बंधाऱ्यामुळे या गावातील विहिरी, कूपनलिका यांच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ होऊन शेतकरी बागायती पिके चारापिके घेऊ लागले. त्यामुळे दुग्ध उत्पादनातही वाढ होऊन गावातील शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचवला आहे. मात्र, काही वाळूमाफियांची नजर गावातील हंगा नदीपात्रातील वाळूसाठ्यावर पडल्यामुळे येथे रात्रंदिवस यंत्रांच्या साह्याने बेसुमार वाळूउपसा सुरू झाल्याने गाव पुन्हा दुष्काळाच्या छायेत जाण्याची शक्यता निर्माण झाल्याने आपधूप ग्रामपंचायतीने तातडीची ग्रामसभा बोलावून या विषयावर गांभीर्याने चर्चा करण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी हंगा नदीपात्रात वाळूउपसा होऊ देण्याचा निर्णय बहुमताने घेतला. 


वाळूउपसा होऊ देण्यासाठी वाळूउपसा प्रतिबंधक कमिटीची स्थापना करण्यात आली असून माजी सरपंच किसन साहेबराव गवळी यांना अध्यक्ष करण्यात आले आहे. या कमिटीमध्ये सरपंच संगीता सोनवणे, उपसरपंच नामदेव गवळी, माजी सरपंच किसन भगवंत गवळी, गोकूळ गवळी, भाऊसाहेब दत्तू गवळी, माजी सैनिक बन्सी गवळी, माधव गवळी, लक्ष्मण गवळी, प्रकाश गवळी, तंटामुक्ती अध्यक्ष संतोष गवळी, जयसिंग गुलाब गवळी यांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली. 


यावेळी अॅड. रामचंद गवळी, ज्ञानदेव गवळी, पोपट गवळी, भाऊसाहेब मारुती गवळी, सोनबा चव्हाण, अनिल गवळी, ग्रामसेवक नीलेश माने, रामभाऊ कसबे, पांडुरंग गवळी आदी उपस्थित होते. 


...तर पुन्हा दुष्काळ 
परिसरातीलगावांपैकीआपधूप गावातील नदीपात्रात साठवण बंधाऱ्यांमुळे मोठ्या प्रमाणात पाणीसाठा आहे, जर वाळूउपसा झाला, तर गावाला पुन्हा दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागतील, म्हणून आम्ही आपधूप गावातून वाळूउपसा होऊ देणार नाही.
- किसन गवळी, अध्यक्ष, वाळूउपसा प्रतिबंधक कमिटी. 

बातम्या आणखी आहेत...