आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिर्डीला अालेले विमान वादळी पावसामुळे हैदराबादला परतले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- शिर्डी शहर अाणि विमानतळ परिसरात शुक्रवारी दुपारी चार वाजेच्या अालेल्या जाेरदारी वादळी पावसामुळे शिर्डी विमानतळाच्या अरायव्हल एन्ट्री गेटजवळील टर्मिनलची काचेची वाॅल (पार्टिशन), फर्निचर उद‌्ध्वस्त झाल्याने विमानतळाचे लाखाे रुपयांचे नुकसान झाले. विमानतळाच्या पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या छोट्या खासगी विमानांची दिशा बदलली. मात्र, त्याचे काही नुकसान झाले नाही. हैदराबादहून शिर्डीपर्यंत पाेहाेचलेले विमान नियंत्रण कक्षाकडून खराब हवामानामुळे लँडिंगचे काेणतेही सिग्नल न मिळाल्याने अाैरंगाबादकडे वळविण्यात आले. तेथेही हवामान असेच असल्यामुळे पुन्हा प्रवाशांसह हैद्राबादला परतले.

 

अाैरंगाबादलाही हवामान खराब, टळले लँडिंग 
वादळाचा जोर वाढतच असतानाच हैदराबादहून एअर अलायन्सचे विमान उतरण्यासाठी शिर्डी विमानतळावर घिरट्या घालू लागले. मात्र, खराब हवामानामुळे दृश्यमानता कमी झाली. त्यामुळे नियंत्रण कक्षाकडून (एटीसी) पायलटला लँडिंगसाठी सिग्नल मिळत नसल्याने ते औरंगाबादच्या दिशेने रवाना झाले. तेथेही हवामानाची स्थिती शिर्डीप्रमाणेच असल्याने तेथेही लँडिंग हाेऊ शकले नाही. अखेर ते प्रवाशांसह हैदराबादला परतले. त्यामुळे त्या विमानाने अालेले प्रवासी शिर्डीला उतरू शकले नाहीत. शिर्डीहून तेच विमान प्रवासी नेते. ते उड्डाण शुक्रवारी रद्द झाले. 


हवामान चांगले असल्यास अाज उड्डाणे 
सध्या शिर्डीसाठी मुंबई अाणि हैदराबादहून इंडियन एअरलाइन्सची उपकंपनी असलेल्या एअर अलायन्सने विमानसेवा सुरू केली आहे. त्यास प्रवाशांचा प्रतिसादही चांगला आहे. खराब वातावरणामुळे शुक्रवारी हैदराबादहून येणारे विमान उतरू न शकल्याने शिर्डीवरून हैदराबादला जाणाऱ्या ६५ प्रवाशांचे हाल झाले. विमान कंपनीने सर्वांचे पैसे परत केले. वातावरण चांगले असेल तर शनिवारी मुंबई आणि हैदराबादला येथे जाणाऱ्या व येणाऱ्या विमानांची उड्डाणे नियमित वेळापत्रकाप्रमाणे होतील, अशी माहिती विमानतळ कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिली. 


दुरुस्तीचे कार्य युद्धपातळीवर हाती 
साईबाबा इंटरनॅशनल विमानतळाचे वादळी पावसाने नुकसान झाले अाहे. किती रुपयांची हानी अाहे हे आत्ताच सांगता येणार नाही. मात्र, दुरुस्तीचे कार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात येईल अाणि सेवा पूर्ववत करण्यात येणार आहे. 
- धीरेन भोसले, संचालक, शिर्डी विमानतळ कंपनी 

बातम्या आणखी आहेत...