आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निळवंडे प्रकल्प : आमदार थोरात यांच्या पाठपुराव्याला यश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- निळवंडे प्रकल्पाला केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीची अंतिम मान्यता मिळाली असल्याने निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दरम्यान, त्याचे श्रेय विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे यांनी घेतल्यानंतर आमदार बाळासाहेब थोरात यांनीही गुरुवारी तसा दावा केला. 


उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण आमदार थोरात यांनी पूर्णत्वास नेले. दुष्काळी भागाला पाणी देण्यासाठी कालव्यांची कामे लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी थोरात व कालवा कृती समितीने सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले. दिल्ली येथे केंद्रीय जलसंपदा विभागाचे सचिव सिंग यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस टीडब्लुसीचे अध्यक्ष हुसेन, मेंबर सेक्रेटरी दास, राज्य सरकारच्या वतीने नाशिक विभागाचे मुख्य अभियंता किरण कुलकर्णी, अहमदनगरच्या उपअभियंता अलका अहिरराव, संगमनेर विभागाचे कार्यकारी अभियंता रवींद्र बागूल व उपअभियंता विवेक लवहात आदी उपस्थित होते. 


आधी पुनर्वसन मग धरण हा आदर्शवत निळवंडे पॅटर्न राबवून आमदार थोरात यांनी धरण पूर्ण केले. या कामी माजी मंत्री मधुकर पिचड यांचे मोलाचे सहकार्य लाभले. अनेक ठिकाणी कालव्यांची कामे पूर्ण करताना कौठे कमळेश्वर, पिंपळगाव कोंझिरा, गणेशवाडी (झोळे) येथील मोठे बोगदे तयार करण्यात आले. नद्या व मोठ्या ओढ्यांवरील पुलाची कामे मार्गी लावली. 


निधीअभावी मागील ४ वर्षांपासून कालव्यांची कामे बंद होती. हे काम तातडीने सुरू करावे, यासाठी आमदार थोरात व कृती समितीने सातत्याने पाठपुरावा केला. विविध आंदोलने करून जनरेटा उभा केला. त्याचे फलित म्हणून केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीची अंतिम मान्यता मिळाली. 


दुष्काळग्रस्त भागात आनंदाचे वातावरण 
निळवंडे प्रकल्पाच्या कालव्यांच्या कामाला केंद्रीय तांत्रिक सल्लागार समितीची मान्यता मिळाली आहे. तसेच याचा बळीराजा योजनेत समावेश झाला. या मान्यतेमुळे राज्य सरकारकडून या कामासाठी २२०० कोटींचा निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाल्याने दुष्काळग्रस्त भागात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. 

 

बातम्या आणखी आहेत...