आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजारपणाने व्यथित वृद्धेने घेतले स्वतःला पेटवून; अहमदनगर ‍जिल्ह्यातील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- नेवासे तालुक्यातील माका गावच्या शिवारात कोकाटे वस्तीवरील 75 वर्षीय वृद्धेने आजरपणाला कंटाळून राहत्या घरापासून सुमारे 100 फूट अंतरावर रॉकेल टाकून स्वत:ला पेटवून घेतले. त्यात त्यांचा मृत्यू झाला आहे. आज (बुधवार) पहाटेच्या सुमारास ही घटना घडली. वैजंताबाई दशरत काेकाटे (रा, कोकाटे वस्ती, माका शिवार) असे मृत महिलेचे नाव आहे.

 

मागील 4-5 वर्षांपासून त्या कर्करोगासारख्या व्यधीने ग्रस्त होत्या व अंगाला सतत खाज येत होती, बुधवारी पहाटे अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेतले त्यात मृत्यू झाला. सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पुढील कार्यवाही सुरू आहे.

 

वैजयंता कोकाटे यांना तीन विवाहित मुले आहेत, त्यापैकी एक रायगड जिल्ह्यात शिक्षक म्हणून नोकरीला आहे, माक्यात दुसऱ्या मुलांसोबत त्या राहत होत्या. हा मुलगा शेती करतो. कोकाटे दररोज घरा समोरच्या ओट्यावर झोपायच्या. सकाळी त्या दिसल्या नाही म्हणून सुनेने पाहिले..

शोधाशोध केली असता जवळच त्या जळालेल्या अवस्थेत आढळल्या. घटनेची माहिती मिळताच सोनईचे एपीआय किरण शिंदे तेथे गेले. प्राथमिक चौकशी केली असून आत्महत्या केल्याचे निष्पन्न होत असल्याचे त्यांनी दिव्य मराठीला सांगितले. पुढील प्रक्रिया व तपास सुरू आहे.

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... संबंधित घटनेचे फोटो...

 

बातम्या आणखी आहेत...