आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाळूउपसा करताना तरुण गाडला गेला; शेवगाव तालुक्यातील पिंगेवाडीतील घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शेवगाव- नदीपात्रातील खड्ड्यातून वाळूउपसा करताना ढिगारा अंगावर कोसळून नितीन अंकुश निकाळजे (२५) या तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना बुधवारी तालुक्यातील पिंगेवाडी येथे घडली. 


नितीनचा आतेभाऊ नितीन स्वार्थीक अंगरख याने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, पिंगेवाडी येथील सिद्दीक शामद शेख माझ्याकडे आला व नंदिनी नदीवर वाळू भरण्यासाठी ये असे सांगून गेला. मी नदीवर गेलो असता माझा आतेभाऊ नितीन निकाळजे व सख्खा भाऊ जगदीश अंगरख तेथे उपस्थित होते. नदीपात्रात असलेल्या सुमारे दहा फूट खड्ड्यात मला व नितीन निकाळजे याला सिद्दीक शेख याने उतरवले. आम्ही वाळू उचलून वर असलेल्या जगदीशकडे देत होतो. जगदीश तेथे उभ्या असलेल्या ट्रॅक्टरमध्ये वाळू टाकत होता. 


आम्ही ज्या खड्ड्यात उतरलो होतो, त्याच्या बाजूला वाळूचा ढिगारा होता. हा ढिगारा अचानक कोसळला व आमच्या अंगावर पडला. या घटनेत माझ्या पायाला दुखापत झाली, तर नितीन निकाळजे ढिगाऱ्याखाली दबला गेला. मी व जगदीशने आरडाओरडा करत मदत मागितली असता सिद्दीक शेख पळून जाऊन लांब उभा राहिला. नंतर काही तरुण घटनास्थळी आले. आम्ही सर्वानी मिळून वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबलेल्या नितीनला बाहेर काढून शेवगाव येथील दवाखान्यात नेले. नंतर नितीनला नगर येथे हलवले. उपचारांदरम्यान तो मरण पावला. 

बातम्या आणखी आहेत...