आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सभापतिपदासाठी वाकळेंचा एकमेव अर्ज, आज वाकळे यांची बिनविरोध निवड

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापतिपदासाठी गुरूवारी अर्ज दाखल करण्याच्या अंतिम मुदतीत स्थायी समिती सदस्य वाकळे यांचाच एकमेव अर्ज शिल्लक राहिला. त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होणार असून, शुक्रवारी (४ मे) निवडणूक प्रक्रियेत त्यांच्या नावाची घोषणा होईल. 


स्थायी समिती सभापतिपदासाठी गेल्या काही दिवसांपासून राजकीय मोर्चेबांधणी सुरू होती. महापालिकेचे सचिव एस. बी. तडवी यांच्यामार्फत अर्ज घेणे व दाखल करण्याची अंतिम मुदत गुरुवारी होती. वाकळे यांनी यापूर्वीच अर्ज दाखल केला आहे. या निवडणुकीत सभापतिपदासाठी प्रबळ दावेदार मानले जाणारे दत्ता कावरे यांनीच वाकळे यांचे नाव सूचवले. दरम्यान, विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांनी भाजपमधून दत्ता कावरे, तसेच उषा नलावडे यांचे नाव पुढे करत त्यांच्या पाठिंब्यासाठी रणनिती आखली होती. पण वाकळे यांनी जोरदार मोर्चेबांधणी करत सभापतिपद खेचून आणले. 

 

स्थायी समितीतील इतर सदस्यांची मनधरणी करण्यात त्यांनी यश मिळवले. अखेर कावरे हेच वाकळे यांच्या सभापतिपदासाठी सूचक बनले. इतर इच्छूकही अर्ज नेण्यासाठी आले नाहीत. वाकळे यांचा एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला. 

बातम्या आणखी आहेत...