आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खग्रास चंद्रग्रहण बघण्याची संधी; चांदबिबी महाल येथे मोफत दुर्बिण उपलब्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- दुर्मीळ चंद्रग्रहण दुर्बिणीतून पाहण्याची संधी येथील व्हर्सटाईल ग्रूपतर्फे बुधवारी चांदबिबी महाल येथे मोफत उपलब्ध करण्यात आली आहे. नगर - औरंगाबाद रस्त्यावरील एफर्टस्् प्लेनेटेरियममध्येही चंद्रग्रहणाविषयीचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. केतकी जोगदे व कौशिक जाेगदे ग्रहणाविषयी माहिती देतील. 


बुधवारी चंद्र १४ टक्के मोठा व ३० टक्के अधिक प्रकाशमान असेल. ग्रहण लागलेल्या अवस्थेत चंद्र उगवेल. १५० वर्षांनी असे चंद्रग्रहण पहायला मिळत आहे. चंद्रबिंब पूर्णपणे गायब न होता लालसर तपकिरी रंगाचे बघायला मिळेल. खग्रास ग्रहणाचा कालावधी संध्याकाळी ६.२० ते ७.३८ पर्यंत अाहे. संध्याकाळी ५ वाजून १८ मिनिटांनी सुरू झालेले ग्रहण रात्री ८ वाजून ४१ मिनिटांनी सुटेल. 

बातम्या आणखी आहेत...