आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिक्रमण काढण्यासाठी विरोध; विषप्राशनाचा स्टंट, हॉटेल मालक ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सीना नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमण करुन बांधलेले हॉटेल पाडू नये म्हणून अतिक्रमण विरोधी मोहिमेला विरोध दर्शवण्यासाठी विष प्राशनाचा स्टंट केला. मात्र पोलिसंानी तत्परतेने कारवाई करीत हॉटेल मालक पांडुरंग बोरुडे यांना ताब्यात घेतले. या स्टंटबाजीला भीक न घालता अतिक्रमणात असलेल्या हाॅटेल जमीनदोस्त केले. आतापर्यंत सीना नदीपात्रात सुरू असलेल्या कारवाईला कोेणीही प्रत्यक्ष विरोध केला नव्हता. मात्र विरोध केला तरी कारवाई सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. 


नालेगाव अमरधाम शेजारी पांडुरंग बोरुडे यांनी सीना नदीच्या पात्रामध्ये अतिक्रमण करुन हॉटेल बांधले होते. अतिक्रमण हटाव मोहिमेत सुरुवातीला नदीपात्रातील भराव काढल्यानंतर आता काठावरील अतिक्रमणाकडे मोर्चा वळवण्यात आला आहे. सोमवारी जिल्हाधिकारी तथा महापालिकेचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांच्या मार्गदर्शनाखाली सीना नदीपात्रातील अतिक्रमण हटाव मोहिम सुरू झाली. या अतिक्रमणधारकांना प्रशासनाने यापूर्वीची अतिक्रमण काढून घेण्याच्या नोटिसा दिलेल्या होत्या. मात्र ते न काढल्याने कारवाई सुरू केली. 
पांडुरंग बोरुडे यांनी नोटिस मिळूनही त्यांच्या हॉटेलचे अतिक्रमण स्वत:हून काढलेले नव्हते. त्यामुळे अतिक्रमण विभागाचे प्रमुख सुरेश इथापे यांच्यासह इतर कर्मचारी सकाळी ११ वाजता अतिक्रमण हटाव मोहिमेसाठी हॉटेलजवळ दाखल झाले. कारवाई सुरू होताच बोरुडे यांनी त्यांना विरोध दर्शवला. मात्र पथक कारवाई करण्याच्या निर्णयावर ठाम होते. त्यामुळे बाेरुडे यांनी एक विषारी औषधाची बाटली व १ रॉकेलची बाटली हातात घेऊन हॉटेलच्या छतावर चढले. हॉटेल पाडायला सुरुवात केली तर विष प्राशन करुन आत्महत्या करण्याची धमकी दिली. 


बोरुडे यांचा पावित्रा पाहून तेथे काही वेळातच गर्दी गोळा झाली. अतिक्रमण हटाव मोहिमेचे प्रमुख सुरेश इथापे यांनी तातडीने या घटनेची माहिती कोतवाली पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रत्नपारखी यांना दिली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी पोलिसांचे पथक पाठवले. पोलिस आल्याचे पाहताच बोरुडे यांनी विष पिण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचवेळी प्रसंगावधान राखून पांडुरंग बाेरुडे यांना ताब्यात घेतले. तातडीने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्याकडून दोन बाटल्या जप्त करण्यात आल्या. 


कारवाईचा घेतला धसका 
सीना नदीच्या पात्रातील अितक्रमण हटवण्यासाठी महापालिका व महसूल प्रशासनाने सुमारे एक महिनाभरापूर्वी इशरा दिला होता. अितक्रमणधारकांना त्यांचे अितक्रमण स्वत:हून काढून घेण्याच्या नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्यानुसार काही अितक्रमणधारकांनी आपापली अितक्रमणे स्वत:हून काढून घेतली. मात्र, काहींनी मुजोरपणे अितक्रमणे तशीच ठेवली. अितक्रमणविरोधी पथकाने आता यांच्या अितक्रमणांकडे माेर्चा वळवल्याने या कारवाईचा धसका घेतला आहे. 


प्रशासनाचे कोर्टात कॅव्हेट 
सीना नदीपात्रातील अतिक्रमण हटाम मोहिम सुरू होऊन दोन आठवडे होत आले आहेत. सुरुवातीला अतिक्रमणांचे मार्किंग करण्यात आले. नंतर मुख्य पात्रातील गाळ व भराव उपसण्यात अाले. नंतर पात्राचे खोलीकरण करुन रुंदीकरण करण्यात आले. काठावरील काट्या-बाभळी काढण्यात आली. अतिक्रमित शेतीही जमीनदोस्त करण्यात आली. आता हाॅटेलांवर कारवाई सुरू झाली आहे. मात्र काेणी कोर्टात जाऊन मोहिमेला स्थगिती आणू नये म्हणून प्रशासनाने आधीच खबरदारी घेत कोर्टात कॅव्हेट दाखल केले आहे. 


तरीही कारवाई सुरूच 
बोरुडे यांच्या स्टंटनंतर अतिक्रमण हटाव मोहिमेत अडथळा येताे की काय, असा अंदाज होता. मात्र जिल्हाधिकारी तथा मनपाचे प्रभारी आयुक्त राहुल द्विवेदी यांनी घटनास्थळी भेट देवून माहिती घेतली. तसेच कारवाई सुरूच ठेवण्याचे आदेश दिले. नंतर पोलिस बंदोबस्तात पोकलेनच्या साह्याने बोरुडे यांनी अतिक्रमणात बांधलेले हॉटेल पाडण्यात आले व नदीच्या खोलीचे काम सुरू करण्यात आले. याप्रकरणी कोतवाली पोलिसांत गुन्हा नोंदवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले. कोणी विरोध केला तरी कारवाई सुरूच राहणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...