आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपाची जप्तीची कारवाई; मालमत्ताधारकांकडून ८ लाख ८६ हजारांचा भरणा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शहरातील प्रभाग समिती तीन व प्रभाग समिती दोनमध्ये महापालिकेच्या पथकाने ट्रस्ट कार्यालयासह काही गाळ्यांवर मंगळवारी जप्तीची कारवाई केली. तर काही मालमत्ताधारकांनी ८ लाख ८६ हजारांचा भरणा केला. 


झेंडीगेट भागात नागोरी मुस्लिम मिसगर जमात ट्रस्ट (दाणेडबरा), तसेच घर नंबर १२४४ यांच्याकडे सुमारे १ लाख ६८ हजार व ९ लाख २१ हजारांची थकबाकी आहे. त्यामुळे ट्रस्टच्या शाळेचे कार्यालय सील करण्यात आले. जोशी आनंद यांचा कैकाडी महाराज व्यापारी संकुलातील गाळा १ लाख १३ हजारांच्या थकबाकीपोटी सील करण्यात आला. प्रभाक आठमधील गुलाम गौस नवाब तांबटकर यांचे घर व शहाजी रोडवरील दोन गाळे ५ लाख थकबाकीपोटी सील करण्यात आले. पथक गेल्यानंतर राजेश उपाध्ये यांनी दीड लाखाचा धनादेश दिला. 

बातम्या आणखी आहेत...