आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुंबईत सुरू असलेल्या जाेरदार पावसामुळे राज्यराणी, गोदावरी रद्द

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनमाड- मुंबईत सुरू असलेल्या जाेरदार पावसामुळे बुधवारी (दि. ४) मनमाड रेल्वे स्थानकातून सुटणाऱ्या मनमाड-मुंबई राज्यराणी एक्स्प्रेस (२२१०२/२२१०१)आणि मनमाड-कुर्ला गोदावरी एक्स्प्रेस (१२११८/१२११७) या दोन्ही गाड्या रद्द करण्यात आल्याची घोषणा रेल्वे प्रशासनाने केली आहे. यासंदर्भात मंगळवारी दुपारी येथील रेल्वे बुकिंग कार्यालयाजवळ तशी सूचना लावण्यात आली आहे. 


राज्यातील काही भागासह उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून जाेरदार पाऊस सुरू असल्यामुळे रेल्वेचे वेळापत्रक अगोदरच कोलमडले आहे. त्यातच वाराणसी येथे काही तांत्रिक काम सुरू असल्यामुळे तेथून धावणाऱ्या महाराष्ट्रातील चार ते पाच रेल्वे प्रशासनाने तब्बल महिनाभरासाठी रद्द बंद आहेत. 

 

बातम्या आणखी आहेत...