आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संस्थाचालकाने केला विधवा वसतीगृह अधीक्षिकेवर अत्याचार, मुलींच्या वसतीगृहातील प्रकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर- संस्थाचालकाकडून विधवा वसतीगृह अधिक्षीकेवरच अत्याचार केल्याची घटना उघड झाली. बेलापूर येथील मुलींच्या एका वसतीगृहात हा प्रकार घडला. याप्रकरणी पिडीतेने दिलेल्या फिर्यादीवरून अशोकलाल रतनलाल शहा (६५, रा. टिंगरेनगर, विश्रांतवाडी, पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. 


न्यायालयाने त्यास ५ दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. पिडीता सन २०१४ पासून या वसतीगृहात कार्यरत होती. आरोपी वरचेवर या वसतीगृहात मुक्वामासाठी येत. २५ मे रोजी त्याने नोकरीवरून काढून टाकण्याची तसेच समाजात बदनामी करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. वाच्यता केल्यास नोकरीवरून काढून टाकण्याची धमकी दिली. 

बातम्या आणखी आहेत...