आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दरोड्याच्या तयारीत असलेली टोळी गजाआड; १० लाखांचा मुद्देमाल जप्त

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नेवासे- दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाचजणांना गुरुवारी पहाटे पोलिसांनी खडकेफाटा ते सलाबतपूर रस्त्यावर पकडले. शस्त्र व इनोव्हा कार असा १० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या आरोपींना ५ दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली. 


टोळीची खबर मिळताच सहायक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे, उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे खासगी वाहनाने सलाबतपूर रस्त्यावरील आडवी चारीजवळ पोहोचले. इनोव्हा कारजवळ (एमएच०५ बीएस ४७१६) पाचजण संशयास्पद हालचाली करताना दिसताच पथकाने त्यांना पकडले. त्यांच्याकडे चॉपर, लोखंडी रॉड, दोन लाकडी दांडके, तीन दोऱ्या, सात सुतळी अँटमबाँब, डिझेल ड्रम, दोन मोबाइल, पाच मास्क सापडले. सुजित भिकन देवकुळे (२६, हरेगाव, ता. श्रीरामपूर), संदीप एकनाथ ढगे (२६, खोकर, ता. श्रीरामपूर), रोहन विलास शिंदे (२५, चाळीसगाव), अभिजित मधुकर जोंधळे (२५, संगमनेर रोड, श्रीरामपूर), दीपक बाबासाहेब शेटे (२३, संजयनगर, श्रीरामपूर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता आहे. 


गोर्डे, उपनिरीक्षक प्रमोद भिंगारे, बाबासाहेब लबडे, विठ्ठल गायकवाड, तुळशीराम गिते, सुहास गायकवाड, महेश कचे, संभा गर्जे, संदीप म्हस्के, अंबादास गिते यांनी ही कारवाई केली. रस्ता अडवण्यासाठी १५ फुटी ३ दोऱ्या, तसेच ओळख लपवण्यासाठी मास्क, गोळीबाराचा आवाज काढण्यासाठी सुतळीबॉम्ब, नंबरप्लेट बदललेली कार ही रस्तालुटीची पद्धत असल्याचे निष्पन्न झाले. 
 

बातम्या आणखी आहेत...