आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हक्काच्या मागण्यांची ‘गुढी’: स्वतंत्र जिल्ह्याच्या मागणीसाठी संगमनेरकरही उतरले रस्त्यावर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- नगर जिल्हा विभाजनाबाबत अद्याप साशंकता असतानाच संगमनेरकरांनी मात्र विभाजनाचा लढा सुरू केला आहे. रविवारी जिल्हा कृती समितीच्या माध्यमातून संगमनेर जिल्ह्याचे मुख्यालय जाहीर करावे, या मागणीसाठी स्वतंत्र जिल्ह्याची गुढी उभारण्यात आली.   

पालकमंत्री राम शिंदे यांनी केलेल्या जिल्हा विभाजनाच्या घोषणेनंतर जिल्ह्यात श्रीरामपूर व संगमनेर येथून जिल्हा निर्मितीच्या मागणीला वेग अाला अाहे. नव्या जिल्ह्याचे मुख्यालय संगमनेर येथेच करण्यात यावे, यासाठीचा लढा संगमनेरकरांनी सुरू केला. पंधरा दिवसांपासून जिल्हा मागणीसाठी संगमनेर-अकोलेकरांनी संगमनेरात सह्यांची मोहीम सुरू केली. आत्तापर्यंत ८० हजार लोकांनी सह्या करून या मोहिमेला पाठिंबा दिला आहे.  गुढीपाडव्याचे औचित्य साधत रविवारी कृती समितीच्या वतीने बसस्थानकाबाहेर सह्यांसाठी तयार करण्यात आलेल्या मंडपावर नव्या संगमनेर जिल्ह्याची गुढी महिलांच्या हस्ते उभारण्यात आली. या वेळी जिल्हा कृती समितीचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते.  संगमनेर जिल्हा झालाच पाहिजे, हा संकल्प करत उपस्थितांनी तशा घोषणा दिल्या.  

बातम्या आणखी आहेत...