आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पथदिवे घोटाळा : फाइली पळवण्यासाठी वापरलेली अभियंता सातपुतेची कार जप्त

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - पथदिवे घोटाळ्याचा सूत्रधार रोहिदास सातपुते याने ज्या कारमधून पथदिव्यांच्या मूळ फाईली पळवल्या, ती पोलिसांनी बुधवारी दुपारी ताब्यात घेतली. त्याचबरोबर सातपुतेच्या उपस्थितीत महापालिका कार्यालयातही पोलिसांनी झडती घेतली. काही संशयास्पद फाईली पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. दरम्यान, याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी ठेकेदार सचिन लोटके याला पुन्हा पोलिस कोठडी देण्याची मागणी पोलिस न्यायालयाकडे करणार आहेत.

 

महापालिकेतील ३६ लाख ६५ हजार रुपयांच्या पथदिवे घोटाळ्यातील मुख्य आरोपी सातपुते याची कसून चौकशी सुरू आहे. न्यायालयाने त्याला २४ मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून फरार असलेल्या सातपुते याची संपत्ती जप्त करण्याची तयारी पोलिसांनी सुरू केली होती. त्याचबरोबर त्याच्याविरोधात स्टँडींग अटक वॉरंट काढावे, अशा मागणीचे पत्रही पोलिसांनी न्यायालयाला दिले होते. पोलिसांच्या या कारवाईच्या भितीपोटी सातपुते स्वत:हून पोलिसांसमोर हजर झाला.


तत्कालीन महापालिका आयुक्त घनश्याम मंगळे यांच्या फिर्यादीवरून तोफखाना पोलिसांनी सातपुते याच्यासह चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. आरोपी ठेकेदार सचिन सुरेश लोटके, कर्मचारी बाळासाहेब चंद्रकांत सावळे व भरत त्र्यंबक काळे या आरोपींचा घोटाळ्यात समावेश असून त्यांना अटकही करण्यात आली आहे. सातपुते मात्र गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता. सोमवारी (२१ मे) सकाळी तो पोलिसांना शरण आला. पुढील चौकशीसाठी पोलिसांनी त्याला महापालिका कार्यालयात आणले होते. तो ज्या कार्यालयात बसून कामकाज करत होता, तेथील फाईली पोलिसांनी तपासल्या. काही संशस्पद फाईली पुढील तपासासाठी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत. पोलिस निरीक्षक सुरेश सपकाळे हे स्वत: यावेळी उपस्थित होते. दरम्यान, सातपुते याच्या पोलिस कोठडीची मुदत संपत असल्याने त्याला गुरूवारी न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.

 

फिगो कारमधून पळवल्या फाईली
आरोपी सातपुते व ठेकेदार लोटके हे दोघे घोटाळ्याचे सूत्रधार आहेत. सातपुते याने पथदिव्यांच्या कामाच्या मूळ फाईली त्याच्या फिगो कारमधून पळवल्या असल्याचा जबाब लोटके याने पोलिसांना दिला होता. त्यामुळे पोलिसांनी सातपुतेची ही कार ताब्यात घेतली आहे. त्याचबरोबर सातपुते काम करत असलेल्या महापालिकेतील बांधकाम व विद्युत कार्यालयाची पोलिसांनी झडती घेतली.

 

सातपुतेने केली पंढरपूर यात्रा
सातपुते हा गेल्या तीन महिन्यांपासून फरार होता. गुन्हा दाखल होण्यापूर्वी त्याची महापालिका प्रशासन चौकशी करत होते. त्यामुळे सातपुते याने मिळालेल्या मधल्या वेळेत मूळ फाईली लपवल्या आहेत. फरार असताना पंढरपूरसह अन्य ठिकाणी गेला असल्याचे सातपुते सांगत आहे. लोटके याच्या पोलिस कोठडीची मागणी करणार आहे. दोघांच्या चौकशीतून सत्य समोर येईल.
- सुरेश सपकाळे, पोलिस निरीक्षक

 

बातम्या आणखी आहेत...