आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ऑफिस दाखवण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने केले अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- ऑफिस दाखवण्याच्या बहाण्याने अकोले तालुक्यातील एका भोंदू बाबाने अल्पवयीन मुलाचे लैंगिक शोषण केल्याची घटना आहे. अनिल तळपे असे आरोपी बाबाचे नाव असून त्याच्या विरोधात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


अनिल तळपे पीडित मुलाला ऑफिस दाखवण्याच्या बहाण्याने बसस्थानकाजवळील एका कॉम्पलेक्समध्ये घेऊन गेला. तिथे आसपास कुणी नसल्याची खात्री करून त्याने मुलाचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मुलाने त्याच्या तावडून सुटका करून घेत तेथून पळ काढला आणि घडलेल्या प्रकाराची माहिती वडिलांना दिली. यानंतर वडिलांनी तात्काळ ओकोले पोलिसात धाव घेऊन आरोपी विरोधात तक्रार दिली. 

बातम्या आणखी आहेत...