आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भाळवणीजवळ एसटी-कार धडक; नगरचे शहा दाम्पत्य ठार, १ जखमी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पारनेर- पारनेर तालुक्यातील भाळवणीजवळ कल्याण-विशाखापट्टणम राष्ट्रीय महामार्गावर कापरी चौकात मंगळवारी दुपारी १ च्यादरम्यान एस. टी. बस व कारची धडक होऊन दोन ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला. जखमींना नगर येथे हलवण्यात आले आहे. 


भाळवणीपासून १ किलोमीटर अंतरावर गोरेगाव फाट्याजवळ माळकूप शिवारात हा अपघात झाला. नगरहून कल्याणकडे जात असलेल्या गेवराई-भिवंडी एसटी बस (एमएच २० बीएल ३०६६) व कल्याणकडून नगरला येत असलेल्या एमएच १६ बी एच ७७४३ या क्रेटा कंपनीच्या कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारमधील पंकज शहा व त्याची पत्नी रुपाली (राहणार नगर) हे ठार झाले. शहा यांचा मित्र गंभीर जखमी झाला. त्याच्यावर नगर येथे उपचार सुरू आहेत. अपघात झाल्याचे कळताच पारनेरचे पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे, हेडकॉन्स्टेबल अण्णा चव्हाण, शेख, गायकवाड घटनास्थळी दाखल झाले. भाळवणी येथील संतोष पारख व माळकूप परिसरातील तरुणांनी अपघातग्रस्तांना मदत केली. 

बातम्या आणखी आहेत...