आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेकायदेशीर नोकरभरती: शनिशिंगणापूरमधील उपोषण मागे, गावकऱ्यांच्या रेट्यामुळेच प्रशासन झुकले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेवासे - शनिशिंगणापूर देवस्थानमधील कथित बेकायदेशीर नोकरभरती प्रकरणी गेले ५ दिवस चालू असलेले सरपंच बाळासाहेब बानकर, विश्वस्त डॉ. वैभव शेटे यांच्या नेतृत्वाखालील उपोषण प्रोसिडिंग व मागणीनुसार मिळालेल्या काही माहितीनंतर बुधवारी मागे घेण्यात आले.

 

नोकरभरतीबाबतची प्रक्रिया व सर्व पगारपत्रके मिळावीत आणि देवस्थानच्या मालकीच्या सर्व वाहनांची माहिती मिळावी, यासाठी उपोषण चालू होते. नोकरभरती रद्द करत असल्याचा ठराव करून प्रोसिडिंग दिले होते. भरती रद्द झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रतिउपोषणामुळे तणाव निर्माण झाला होता. सकाळी पुन्हा एकदा तहसीलदार उमेश पाटील यांनी दोन्ही बाजूंशी चर्चा केली. उपोषणार्थीच्या म्हणण्यानुसार ठरावात बदल करणारा ठराव करण्यात आल्यानंतर उपोषण मागे घेतले.

 

२०१२ ते २०१८ चे प्रोसिडिंग, वाहनांची माहिती व कागदपत्रे तसेच जूनच्या पगारपत्राच्या प्रती देण्यात आल्या. २०१२ पासून मे २०१८ पर्यंतचे पगारपत्रके देण्यासाठी ८ दिवसांची मुदत देण्यात आली. माहिती मिळाल्यानंतर उपोषणार्थीचे समाधान झाले. नोकरभरती रद्द झाल्यामुळे १०६ पैकी काही जण उपोषणाला बसले होते. त्यांचेही उपोषण सोडण्यात आले. या आंदोलनानंतरही या नोकरभरतीबाबत संभ्रमच आहे. ही टांगती तलवार केव्हा बाजूला जाईल यासाठी त्यांनी शनी देवाला साकडे घातले.


तहसीलदार उमेश पाटील, पोलिस उपअधीक्षक मंदार जावळे यांच्या हस्ते नारळपाणी देऊन उपोषण सोडण्यात आले. यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष सचिन देसरडा, ज्ञानेश्वर पेचे, सतीश कर्डिले, नवनीत सुरपुरिया, सायराम बानकर, प्रकाश शेटे आदी उपस्थित होते.

 

गावकऱ्यांच्या रेट्यामुळेच प्रशासन झुकले
शनैश्वर देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांनी भरती प्रक्रियेबाबत झालेल्या प्रकारची जबाबदारी स्वीकारावी. या प्रकरणाचे खापर आमच्यावर फोडण्याचे पाप करू नये, असे विश्वस्त बापूसाहेब शेटे म्हणाले. शिंगणापूरच्या ग्रामस्थांसमोर विश्वस्त मंडळाचा गैरव्यवहार उघड करण्यात आम्हाला यश आले. गावकऱ्यांच्या रेट्यामुळेच प्रशासन झुकले, अशी प्रतिक्रिया सरपंच बाळासाहेब बानकर यांनी व्यक्त केली.

 

बातम्या आणखी आहेत...