आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साईंच्या जन्मस्थानावरून शिर्डी ग्रामस्थ संतप्त; पाथरी येथील विकासकामावर वाद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिर्डी- साईबाबा कोणत्या जातीचे, पंथाचे, वंशाचे हे कोणालाही माहीत नसताना व साईबाबांच्या साई चरित्रात कोठेही उल्लेख नसताना पाथरी हेच साईबाबांचे जन्मस्थळ असून  या गावाचा विकास आराखडा राष्ट्रपतींच्या शिफारशीवरून सरकार बनवत असल्याच्या प्रकरणावरून शिर्डी ग्रामस्थांमध्ये असंतोष उफाळला अाहे. या असंतोषाला संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांना सामोरे जावे लागले. शिर्डी ग्रामस्थांच्या भावना लक्षात घेऊन हावरे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. साईबाबांच्या जन्मस्थळाबाबत साई चरित्रात दिलेली माहिती प्रमाण असून जन्मस्थळाबाबत जी चर्चा चालू आहे त्यासंबंधात ग्रामस्थांसमवेत राष्ट्रपती व मुख्यमंत्री यांची भेट घेऊन वस्तुस्थितीची माहिती देणार असल्याचे जाहीर केल्याने ग्रामस्थांच्या असंतोषावर मलमपट्टी करण्यात हावरे यांना यश आले.   समाधी शताब्दी सोहळ्याचा शुभारंभ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते झाला. राष्ट्रपतींनी भाषणात  साईबाबांचे जन्मस्थळ परभणी जिल्ह्यातील पाथरी हे असून या गावाचा विकास आराखडा तयार करून तेथील विकास करण्याची गरज आहे, असे म्हटले होते. या विधानामुळे साईभक्तांमध्ये असंतोष आहे. त्यानंतर पाथरी येथील काहींनी भांडवल करत पाथरी गाव साईंचे जन्मस्थळ असून गावाच्या विकासासाठी राष्ट्रपती भवन गाठले. राष्ट्रपतींनी विकास आराखडा तयार करण्याची सूचना सरकारला केली. सरकारही कामाला लागले. या मुळे शिर्डी ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.

बातम्या आणखी आहेत...