आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगरला राजकीय वादातून शिवसेनेच्या दाेन कार्यकर्त्यांची गाेळ्या घालून हत्या;संतप्त जमावाची दगडफेक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय केशव काेतकर व कार्यकर्ते वसंत आनंदा ठुबे या दाेघांची अज्ञात लाेकांनी गाेळ्या घालून हत्या केली. ही थरारक घटना शनिवारी सायंकाळी सहाच्या सुमारास नगर शहराजवळील केडगाव परिसरात घडली. राजकीय वादातून त्यांचा खून करण्यात अाल्याचा संशय अाहे.


या घटनेनंतर संतप्त जमावाने पोलिसांच्या वाहनांवर दगडफेक केली, रास्ता राेकाेही केला. या घटनेमुळे नगर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले हाेते. दरम्यान, हल्लेखाेरांपैकी एक जण स्वत:हून पाेलिसांना शरण अाला.


केडगाव प्रभाग ३२ ब पोटनिवडणुकीचा निकाल शनिवारी जाहीर झाला. काँग्रेसचा उमेदवार येथून निवडून अाला. या निवडणुकीमुळे दाेन गटांत तणावाची परिस्थिती निर्माण झाली हाेती. त्यातच सायंकाळी सहाच्या सुमारास सुवर्णनगर भागात अज्ञात अाराेपींनी काेतकर व ठुबे यांच्यावर गाेळ्या झाडल्या.  हा प्रकार काही लाेकांनी पाहिला.  

 

मात्र दहशतीमुळे परिसरातील नागरिकांनी घरांचे दरवाजे लावून घेतले. दोघेही बराच वेळ जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. त्यांच्या मदतीसाठी कुणीही पुढे अाले नाही. दरम्यान, पोटनिवडणुकीच्या मतदानाच्या वेळी शुक्रवारी विराेधकांनी अापल्याला धमकी दिल्याची तक्रार घेऊन शिवसेनेचे पदाधिकारी निवेदन देण्यासाठी  जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्याकडे गेले होते. निवेदन देऊन ते बाहेर येताच गाेळीबारात गंभीर जखमी झालेल्या संजय कोतकर यांचा शहरप्रमुख दिलीप सातपुते यांना फाेन अाला.  ‘काही लाेकांनी मला गोळ्या घातल्या आहेत, तुम्ही ताबडतोब या, मारेकरी वसंताच्या मागे गेले आहेत,’ असे कोतकर म्हणाल्याचे सातपुते यांनी पाेलिसांना सांगितले. त्यामुळे राजकीय वादातूनच हा खून झाला असल्याचा संशय व्यक्त हाेत अाहे.  दरम्यान, काेतकर व ठुबे यांच्या मृत्यूची बातमी कळताच संतप्त शिवसैनिकांनी घटनास्थळी धाव घेऊन दगडफेक केली, रास्ता राेकाेही केला. जाेपर्यंत अाराेपी पकडले जात नाहीत ताेपर्यंंत मृतदेह उचलू देणार नाही, असा अाक्रमक पवित्राही घेतला. त्यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले हाेते. एका जमावाने माजी महापाैर संदीप काेतकर यांच्या कार्यालयावरही दगडफेक केली. या पार्श्वभूमीवर शहरात पाेलिस बंदाेबस्त वाढविण्यात अाला असून रॅपिड अॅक्शन फाेर्सही तैनात केला हाेता.  शिवसेनेने रविवारी जिल्हा बंदचे आवाहन केले आहे. 

 

राष्ट्रवादी कार्यकर्त्यांची एसपी अाॅफिसवर दगडफेक
मतदानाच्या वेळी राष्ट्रवादीचे अामदार संग्राम जगताप यांच्याशी काही शिवसैनिकांचा वाद झाला हाेता. त्यांच्या सांगण्यावरूनच हा हल्ला झाला असावा, असा शिवसैनिकांचा अाराेप हाेता. त्यानुसार पाेलिसांनी जगताप यांना चाैकशीसाठी बाेलावले. मात्र अामदारांना अटक झाल्याची अफवा पसरली. त्यामुळे जगताप समर्थकांनी एसपी अाॅफिसात घुसून ताेडफाेड करत अामदारांना अक्षरश: पळवून नेले. या ८ जणांना नंतर पाेलिसांनी ताब्यात घेतले.

 

शिवसेनेने लढवली  होती स्वतंत्र निवडणूक
माजी आमदार अनिल राठोड  यांनी ही जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायचीच असे ठरवून  विजय पठारे यांना साथ दिली. शिवसेनेने स्वतंत्र निवडणुका लढविण्याच्या निर्णयानंतर ही पहिलीच निवडणूक होती. महापालिकेत एकहाती सत्ता असतानाही शिवसेनेनेला ही जागा गमावाली लागली. 

बातम्या आणखी आहेत...