आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खड्डे बुजवण्यासाठी मातीमिश्रीत मुरूम; नगरपालिका कार्यालयासमोर शिवसेनेचा ठिय्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीगोदे- शहरातील खड्डे बुजवण्यासाठी मातीमिश्रीत मुरूम वापरण्यात येत आहे. शहरातील १७ रस्त्यांच्या संदर्भात निवेदन देऊनही काम न झाल्याने शिवसेना जिल्हा समन्वयक घनश्याम शेलार यांच्या नेतृत्वाखाली गुरूवारी नगरपालिका कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे. 


शिवसेने ५ जुलै रोजी शहरातील रस्ते व आरोग्यासंदर्भात निवेदन दिले होते. ११ जुलैपर्यंत कार्यवाहीची मागणी शिवसेनेने केली होती. मात्र, पालिका प्रशासनाने कोणतीही कार्यवाही केली नाही. १० जुलै रोजी पालिकेने चुकीच्या पद्धतीने वरच्यावर खड्डे बुजवणे चालू केले. खड्डे बुजवण्यासाठी मातीमिश्रीत मुरूम वापरण्यात येत आहे. तो खड्ड्यांमध्ये टाकण्यात येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात अपघातांचे प्रमाण आणखी वाढणार आहे. दर्जेदार डांबर वापरून त्यावर व्यवस्थित रोलर फिरवून खड्डे दुरूस्त करणे आवश्यक आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. 


पावसाळ्यात साथीचे आजार पसरतात. याबाबत पालिकेने काहीच उपाययोजना केलेल्या नाहीत. पालिकेच्या कार्यालयातच अस्वच्छता आहे. त्यामुळे पालिका शहरातील स्वच्छता काय करणार? असा प्रश्न आंदोलकांनी उपस्थित केला. शेलार म्हणाले, खड्ड्यात टाकलेला मुरूम पावसाळ्यात वाहून जाईल. तुम्ही पक्के काम करायला पाहिजे होते. पालिका प्रशासन स्वच्छतेच्या गप्पा मारत आहे. 


तथापि, पालिकेचे कार्यालयाच इतके अस्वच्छ आहे, तर शहर कधी स्वच्छ करणार. आरोग्य व रस्त्याच्या प्रश्नावर शेलार यांनी नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरातील १७ रस्त्यांच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनानुसार चौकशी करण्यात येणार असल्याचेही शेलार यांनी यावेळी नमूद केले. यावेळी वाहतूक सेना जिल्हाप्रमुख संजय सांगळे, शहरप्रमुख भाऊ पुराणे, तालुकाप्रमुख संजय आनंदकर, नितीन रोही, भाऊसाहेब गोरे, अनिल सुपेकर, अनिल हिरडे आदी उपस्थित होते. 


मोठ्यांवरही कारवाई करा 
नगरपालिकेने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्ते वर्ग का करून घेतले? सर्वांना समान नियम असावेत. सर्व रस्त्यावर मध्यापासून सीमा निश्चित करून अतिक्रमणांची मोठ्यांवरही कारवाई करावी, असे शेलार म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...