आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलाशी लैंगिक चाळे करणाऱ्या दुकानदारास अटक; संगमनेरमध्ये शाळेसमोरील घटना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- दुकानात पुस्तक खरेदीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलाशी लैंगिक चाळे करणाऱ्या विकृत दुकानदारास शहर पोलिसांनी अटक केली. संबंधित मुलाच्या तक्रारीवरुन शहर पोलिसांनी राजेश दिगंबर पाठक याच्याविरोधात गुन्हा दाखल केला. दुकानदाराला पोलिसांनी अटक केल्याने व्यावसायिकात खळबळ उडाली. 


पंधरा वर्षांचा शाळकरी मुलगा गुरुवारी सायंकाळी साडेसहा वाजता दहावीची नवी   पुस्तके आली आहेत का, हे पाहण्यासाठी दुकानात आला होता. शहरातील एका विद्यालयासमोर असलेल्या या दुकानात गेलेल्या या मुलाला दुकानमालक पाठक याने काउंटरच्या आतील बाजूला बोलावत त्याचे नाव, गाव विचारले. भविष्यात तुला पुढे काय व्हायचे, अशी विचारणा करत त्याच्याशी विकृत चाळे त्याने सुरु केले. पाच मिनिटांसाठी आत येतोस का, अशी त्याला विचारणा केल्याने या मुलाने तेथून लगेच बाहेर येत आपल्या मित्राला ही माहिती मोबाइलवरुन दिली. 


मुलाचे मित्र, आई-वडील व नातेवाईकांनी दुकानात येऊन घडलेल्या प्रकाराची माहिती घेत शहर पोलिस ठाण्यात पाठक याच्याविरोधात तक्रार नोंदविली. पोलिसांनी दुकानमालकाला ताब्यात घेतले असून सहायक पोलिस निरीक्षक शंकरसिंग राजपुत तपास करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...