आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परस्परविरोधी गुन्हे दाखल करून पुन्हा राजकारण; शिवसेना- राष्ट्रवादीत सोशल वॉर सुरूच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- शिवसेना व राष्ट्रवादीने एकमेकांच्या विरोधात गुन्हे दाखल करून पुन्हा राजकारण सुरू केले. दोन्ही पक्षांकडून सोशल मीडियावर एकमेकांच्या विरोधात चिखलफेक सुरू आहे. हे प्रकरण गुन्हे दाखल करण्यापर्यंत पोहोचले. राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर व शिवसेनेचे योगिराज गाडे यांनी एकमेकांच्या विरोधात जीव मारण्याचा प्रयत्न केल्याच्या फिर्यादी   दिल्या असून पोलिसांनी दोघांविरोधात गुन्हे दाखल केले. 


केडगाव पोटनिवडणुकीच्या दिवशी आमदार संग्राम जगताप यांच्यासह अजिंक्य बोरकर व अन्य दोघांच्या विरोधात जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी योगिराज गाडे यांनी कोतवाली पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार चौघांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दखल करण्यात आला. दरम्यान, तुमच्या आमदाराला खुनाच्या गुन्ह्यात अडकवले आहे, तू जास्त बडबड करू नको, तुझे हातपाय तोडून टाकीन, अशी धमकी गाडे यांनी दिली असल्याची फिर्याद बोरकर यांनी तोफखाना पोलिस ठाण्यात दिली. पोलिसांनी दोघांच्या विराेधात गुन्हे दाखल केले. 


सोशल मीडियावर शिवसेना व उपनेते अनिल राठोड यांची बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणीचा तक्रार अर्ज केडगाव हत्याकांडातील मृत संजय कोतकर व वसंत ठुबे यांच्या कुटुंबीयांनी पोलिसांना दिला आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीदेखील आमदार संग्राम जगताप व अरुण जगताप यांची सोशल मीडियावर बदनामी केल्याप्रकरणी संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यासाठी तक्रारअर्ज दिला आहे. दोन्ही पक्ष एकमेकांच्या िवरोधात फिर्यादी देत आहेत. 

बातम्या आणखी आहेत...