आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगरमध्‍ये नवरीने भरमंडपात धनुष्‍याद्वारे वेधले अचूक लक्ष, मगच केला विवाह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- राज्‍य पातळीवरील महिला तिरंदाज खेळाडू स्‍वामिनी उनवणे सध्‍या आपल्‍या अनोख्‍या विवाहामुळे चर्चेत आहे. आपल्‍या विवाह समारंभात सप्‍तपदी घेण्‍याअगोदर स्‍वामिनीने भरमंडपात धनुष्याद्वारे लक्ष्‍याचा वेध घेतला. या खेळाबद्दल जागरूकता निर्माण करण्‍यासाठी आपण मंडपातच तिरंदाजीचे प्रात्‍याक्षिक केले, असे नंतर स्‍वामिनीने सांगितले. 

 

- स्‍वामिनी ही श्रीरामपूरचे निवृत्‍त तलाठी अनिल उनवणे यांची मुलगी आहे. मंगळवारी प्रसाद भांगे यांच्‍यासोब तिचा विवाह झाला. यादरम्‍यान तिने स्‍टेजवरच ठेवलेल्‍या लक्ष्‍याचा धनुष्‍याद्वारे अचूक वेध घेतला. उपस्थितांनीही टाळ्या वाजवून तिला दाद दिली. स्‍वामिनीने राज्‍य पातळीवरील अनेक स्‍पर्धांत भाग घेतला आहे. 

 

पाहुण्‍यांचे अनोखे स्‍वागत

यादरम्‍यान तिरंदाजीचे प्रशिक्षण घेत असलेल्‍या मुलांनीही धनुष्‍यबाणाद्वारे मंडपातील फुगे फोडून पाहुण्‍यांचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने स्‍वागत केले. यामुळे या खेळाला प्रोत्‍साहन मिळेल, असे स्‍वामिनीचे प्रशिक्षक शुभांगी दळवी यांनी म्‍हटले आहे. 

 

विवाहानंतरही सुरू ठेवणार प्रॅक्‍टीस 
- राज्‍यपातळीवर तिरंदाजीचे कौशल्‍य दाखवणा-या स्‍वामिनीने विवाहानंतरही आपण तिरंदाजीचा सराव सुरू ठेवणार असल्‍याचे सांगितले आहे. आपल्‍याला राष्‍ट्रीय पातळीवर खेळण्‍याची इच्‍छा आहे असे तिने सांगितले आहे. 

 

पतीने सांगितले, नेहमी प्रोत्‍साहीत करत राहिल 
- याविषयी स्‍वामिनीचे पती प्रसाद भांगे यांनी सांगितले की, 'माझे पती एक चांगले तिरंदाज आहेत. पुढे राष्‍ट्रीय स्‍तरावर खेळण्‍यासाठी मी तिला प्रोत्‍साहित करत राहिल. या खेळासाठी आम्‍ही दोघे मिळून काम करू.'


पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटो...   

 

बातम्या आणखी आहेत...