आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्यास शेण फासले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

राहुरी शहर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुतळ्याला मंगळवारी टाकळीमिया येथे गायीचे शेण फासण्यात आले. मुख्यमंत्र्यांच्या डोक्यात शेतकरीहिताचा प्रकाश पडू दे, अशी प्रार्थना पंढरपूरच्या पांडुरंगाकडे करण्यात आली. 


दुधाच्या भाववाढीची कोंडी फोडण्यात सरकार अपयशी ठरत असल्याने निषेधाच्या घोषणा देत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि मोरे यांनी कार्यकर्त्यांसमवेत सायंकाळी हे आंदोलन केले. आंदोलन चिघळल्यास शासन जबाबदार राहील, असा इशारा मोरे यांनी दिला.निषेध म्हणून टाकळीमिया गावात २ हजार लिटर दुधाचे मोफत वाटप करण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...