आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघातग्रस्त ठिकाणी तातडीने उपाययोजना करा; आमदार बाळासाहेब थोरात यांचा आदेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- नाशिक ते पुणे महामार्गाचे चौपदरीकरण झाल्यानंतरदेखील अनेक ठिकाणी कामे अपूर्ण आहेत. या मार्गावरील अपघातग्रस्त ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याचे आदेश आमदार बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी दिले. 


प्रांताधिकारी कार्यालयात महामार्ग आणि संलग्न विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीत थोरात बोलत होते. त्यांच्यासमवेत थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजित थोरात, जिल्हा परिषदेच्या कृषी समितीचे सभापती अजय फटांगरे, पंचायत समितीचे उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष बाळासाहेब पवार, प्रांताधिकारी भागवत डोईफाेडे, पोलिस उपअधीक्षक अशोक थोरात, मुख्याधिकारी सचिन बांगर, सार्वजनिक बांधकाम व महामार्गाचे अधिकारी उपस्थित होते. 


थोरात म्हणाले, रस्ते आणि प्रवाशांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची आहे. महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने प्रगतीचा वेग वाढण्यास मदत होते. त्याचबरोबर अपघाताचीदेखील शक्यता जास्त वाढते. अपघात वाढणे चिंताजनक आहे. अनेक ठिकाणी अपघातप्रवण क्षेत्र निदर्शनास येत आहेत. या ठिकाणी तातडीने दुरुस्त्या आवश्यक आहेत. केवळ करतो म्हणून चालणार नाही, तर विविध ठिकाणी उपरस्ते, सर्कल, स्पिडब्रेकर आदी कामे तातडीने १ मेपूर्वी हाेणे आवश्यक आहे. नाहीतर मोठ्या जनआंदोलनाला सामोरे जावे लागेल. 


माणुसकी राखून कामे करा. शेतकरी, नागरिकांनी वेळोवेळी मागण्या केल्या असून मीदेखील त्याचा पाठपुरावा करत आहे. या कामात हलगर्जीपणा चालणार नाही, असे थोरात म्हणाले. इंद्रजित थोरात, अजय फटांगरे, रामहरी कातोरे, विजय राहणे, नवनाथ अरगडे, रमेश गुंजाळ आदींसह सोसायटीतील नागरिकांनी विविध सूचना केल्या. महामार्गाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने कार्यवाही केली जाईल, असा शब्द आमदार थोरात यांना दिला. 


या आहेत कमतरता 
महामार्गावर विविध ठिकाणी दिशादर्शक फलक नाहीत. साखर कारखाना, घुलेवाडी, गुंजाळवाडी, मालदाड, वेल्हाळे या परिसरासह अनेक ठिकाणी उपरस्ते तयार करण्यात आलेले नाहीत. माझे घर सोसायटी, आंबीखालसासह काही महत्त्वाच्या ठिकाणी सर्कल बांधण्यात आलेले नाही. अपघातप्रवण क्षेत्रात गतिरोधक बसवलेले नाहीत. चंदनापुरी, आनंदवाडी येथील शेतकऱ्यांना पाइपलाइनची झालेली नुकसान भरपाई मिळाली नाही. चंदनापुरी येथे बसथांबा, सावरगावतळ येथे रस्ता रुंदीकरण, साकूरफाटा, खंदरमाळवाडी येथे स्पीडवे, गतिरोधकांची कामे झालेली नाहीत. 

बातम्या आणखी आहेत...