आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गोंधळ घालणाऱ्या चौथीतील विद्यार्थ्यांना 200 उठबशांची शिक्षा; पालक संतापले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर- गोंधळ घालणाऱ्या चौथीतील विद्यार्थ्यांना शिक्षकाने तब्बल २०० उठबशा मारण्याची शिक्षा केली. या प्रकारानंतर मुलांना चालणेही कठीण झाल्याने पालकांनी तीव्र संताप व्यक्त केला. एवढे होऊनही शाळा व्यवस्थापनाने हात वर केल्याने पालकांनी तालुका शिक्षणाधिकाऱ्याकडे तक्रार केली. रावसाहेब शिंदे प्रतिष्ठान संचलित विद्यानिकेतन ही इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. शुक्रवारी चौथीच्या वर्गातील विद्यार्थी वर्गात गोंधळ घालत होते.


गणेश पाटील या शिक्षकाने गोंधळ घालणाऱ्या विद्यार्थ्यांना २०० उठबशांची शिक्षा दिली. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना चालता येईना, काहींचे पाय सुजले. आर्या पंडुरे या विद्यार्थिनीच्या पालकाने शिक्षणाधिकाऱ्यांकडे तक्रार केली. काही पालक व्यवस्थापनाच्या दबावामुळे बोलत नव्हते. शनिवारी चौथीचे ५३ पैकी १२ विद्यार्थी गैरहजर होते. यापूर्वीही विद्यार्थ्यांचा गणवेश, स्वेटर खरेदी आदी कारणांमुळे पालक व शाळेच्या व्यवस्थापनात वाद झाले आहेत. अशा प्रकारे शिक्षा करणे चुकीचे आहे, परंतु शिस्तीसाठी ही शिक्षा केली असावी, असे मुख्याध्यापक विनोद रोहमारे यांनी सांगितले. शिक्षणाचा बालहक्क कायदा २००९ नुसार चौकशी करून कारवाई करू, असे तालुका शिक्षणाधिकारी सुनील सूर्यवंशी म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...