आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अहमदनगरमध्ये तापमान पोहोचले ४३.८ अंशांवर; चंद्रपूर सर्वांत उष्ण, पारा ४६.४ अंश

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- देशाच्या काही भागांत उसळलेली उष्णतेची लाट विदर्भात सर्वाधिक तीव्र आहे. विदर्भातील सर्व जिल्हे चाळीशीपार आहेत. ही लाट पुढील ४८ तास टिकून राहण्याचा अंदाज वेधशाळेने वर्तवला आहे. चंद्रपूर येथे सर्वाधिक म्हणजे ४६.४ अंश इतक्या तापमानाची नोंद रविवारी झाली. विदर्भात ब्रह्मपुरी येथे ४६, तर नागपूर येथे ४५.२ अंश तापमान नोंदवले गेले आहे. अहमदनगरमध्ये तापमान ४३.८ अंशांवर पोहोचले. परभणीत ४४.७ अंशंाची नोंद झाली. 


यावर्षी उन्हाळा काहीसा आधी सुरू झाला असून उन्हाची तीव्रताही वाढती आहे. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागांत उष्णतेची लाट आहे. राजस्थानात ती तीव्र स्वरुपाची आहे. यामुळे उष्णता जास्त : कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशामुळे उष्ण वारे मैदानी प्रदेशात प्रवेश करत आहेत. परिणामी विदर्भातील उन्हाच्या झळा वाढत चालल्या आहेत. येत्या दोन दिवसांतही हवामान कोरडे राहणार असल्याने उष्णतेचा परिणाम टिकून राहणार आहे, असे आयएमडीने स्पष्ट केले. 


राज्यातील तापमान 
औरंगाबाद ४१.५, परभणी ४४.७, चंद्रपूर ४६.४, ब्रह्मपुरी ४६, वर्धा ४५.८, नागपूर ४५.२, अकोला ४४.७, अमरावती ४३.८, बुलढाणा ४१.२, गोंदिया ४२.५, वाशीम ४२.६, सोलापूर ४३.५, जळगाव ४३.४, सातारा ४०, सांगली ३९.५, नाशिक ३८.१, पुणे ३९.१, कोल्हापूर ३८.६, महाबळेश्वर ३३.२, मुंबई ३३.८ 

बातम्या आणखी आहेत...