आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्धनारी नटेश्वर मोहिनी अवताराचे जगातील एकमेव मंदिर नेवासेनगरीत, पाहा फोटोज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छाया : गुरूप्रसाद देशपांडे. - Divya Marathi
छाया : गुरूप्रसाद देशपांडे.

विष्णूच्या दशावतारांपैकी मोहिनी अवताराचे जगातील एकमेव मंदिर नेवासे येथे आहे. दशावतारात एकमेव असलेल्या अवतारावर राक्षसच नव्हे, तर भगवान शंकरही भाळले होते. खंडोबा अवतारामध्ये पार्वतीने म्हाळसा मोहिनीचेच रूप घेऊन जन्म घेतला. अमृतमंथनानंतर निघालेले अमृत केवळ देवांनाच मिळावे यासाठी विष्णूने मोहिनी अवतार घेत राक्षसांना मोहिनी घातली. समुद्रमंथनात निघालेली सुरा म्हणजे मद्य राक्षसांना, तर देवांना अमृत वाटप केल्याची कथा आहे. या अमृतवाटपात देवांचे रूप घेतलले राहू आणि केतू यांचा विष्णूने शिरच्छेद केला. राज्यातील लाखो भाविकांचे कुलदैवत असलेल्या मोहिनीराजाचा यात्रा महोत्सव रथसप्तमीपासून सुरू झाला. हे मंदिर अहिल्यादेवी होळकरांचे सरदार चंद्रचूड यांनी बांधले. हेमाडपंथी मंदिराचा उत्कृष्ट नमुना असलेले हे मंदिर गावाच्या मध्यभागी आहे. उत्तरमुखी मंदिर असले, तरी मोहिनीराजाची मूर्ती पूर्व-पश्चिम आहे. वालुकामय असलेली मूर्ती सुबक कलाकुसर केलेली आहे. मूर्तीचे अर्धे शरीर पुरुषाचे व अर्धे स्त्रीचे आहे. मोहिनीच्या पायाखाली राहू आहे. मूर्तीच्या हातात शंख, चक्र, गदा, अमृताचा कुंभ, नाकात नथ, कमरेला कमरपट्टा, पायात तोडे असून अंगावर पितांबर आहे. मंदिरावर अप्रतिम कलाकुसर आहे. गाभाऱ्यात रासक्रीडा कोरलेली आहे. छतावरील झुंबर कमळाच्या पाकळ्यांनी युक्त आहे. मंदिराचा प्रत्येक दगड कोरलेला आहे. प्रत्येक खांबाच्या वरती असलेले गंधर्व व प्रवेशद्वारावर असलेले हत्ती उत्कृष्ट कलाकुसरीचा नमुना आहेत. समोर भालदार, चोपदारांच्या सुबक ५-५ फुटी मूर्ती आहेत. शिखरावर कलशांची उतरंड कोरलेली आहे. कळस दगडी व कलाकुसर केलेला आहे.

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज...

 

बातम्या आणखी आहेत...