आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दगडाच्या खाणीत बुडून महिलेसह तिघांचा मृत्यू, मुलाला वाचवताना दुर्घटना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीरामपूर- जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेला मुलगा खाणीत पाय घसरून बुडाला. त्याला वाचवण्यासाठी धावलेला भाऊ व मामीचाही पाण्यात बुडून मृत्यू झाला. वळदगाव शिवारात रविवारी दुपारी ही घटना घडली. मृतांमध्ये कविता गणेश खंडागळे (२८ वर्षे), ओंकार दादासाहेब डुकरे (१० वर्षे) व शुभम दादासाहेब डुकरे (१२ वर्षे, दोघेही शिरोली, ता. जुन्नर, जि. पुणे) यांचा समावेश आहे. 


ओंकार व शुभम हे मामा गणेश खंडागळे यांच्याकडे सुटीसाठी आले होते. दुपारी सर्वजण जनावरांना पाणी पाजण्यासाठी खटकळी येथील दगडखाणीत गेले. एक मुलगा पाय घसरून पाण्यात पडला. हे पाहून मामी कविता व दुसरा मुलगा त्याच्या मदतीला धावले. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तेदेखील बुडाले. 


या घटनेची माहिती मिळताच अनेकांनी खाणीकडे धाव घेतली.पोलिस पाटील शिवाजी नानासाहेब भोसले यांनी पोहणाऱ्यांच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले. घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली होती. या घटनेने वळदगाव परिसरावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. 

बातम्या आणखी आहेत...