आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

​नागरदेवळे ग्रामसभेतच महिलेने घेतले विषारी औषध; महिलेची प्रकृती गंभीर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - अापली जागा नावावर करून देत नसल्याने संतप्त महिलेने शुक्रवारी ग्रामसभेत ग्रामसेवकाच्या अंगावर शाई फेकून विषप्राशन केले. ही घटना शुक्रवारी नगर जिल्ह्यातील नागरदेवळे ग्रामपंचायतीत घडली. छाया बाबासाहेब जरे असे या महिलेचे नाव असून प्रकृती गंभीर असल्याने तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

छाया जरे या नागरदेवळे   गावात संकल्प कॉलनीत राहतात. त्यांच्या नावावर गावात जागा होती. छाया यांचे पती बाबासाहेब जरे विभक्त राहत अाहेत. पती, ग्रामसेवक व इतरांनी संगनमताने छाया जरे यांच्या नावावरील जागा पतीच्या नावावर केली. ही माहिती समजताच छाया जरे यांनी थेट ग्रामपंचायत गाठली. यासंदर्भात ग्रामसेवकांकडे पाठपुरावा करून पतीच्या नावावर करण्यात आलेली जागा आपल्या नावावर करण्याची मागणी त्यांनी केली.

 

मात्र, ग्रामसेवकाने त्याकडे दुर्लक्ष केले. गावात यावर काहीच मार्ग निघत नसल्याने छाया जरे यांनी जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे आपले गाऱ्हाणे मांडले. मात्र, बड्या अधिकाऱ्यांनीही टोलवाटोलवी केल्याचे सांगण्यात आले. 

बातम्या आणखी आहेत...