आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझी संपत्ती काळी, पांढरी नव्हे, भगवी; उद्धव ठाकरे यांचे प्रतिपादन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पारनेर - पारनेरच्या जनतेने मला असा एक सैनिक दिला, ज्याने आजपर्यंत कोणताही त्रास दिला नाही. विजय औटी यांच्या आधी मी पारनेरला आलो होतो. जनतेने त्यावेळी आम्हाला नाकारले. मात्र, उमेदवार बदलल्यानंतर पारनेरकरांनी आम्हाला भरभरून दिले. आमच्या ठाकरे घराण्यात काही लपूनछपून नसतं. जे असते ते जनतेसमोर आहे. जी संपत्ती आहे ती वडिलोपार्जित असून ती काळी पांढरी नाहीतर भगवी आहे!, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी शेतकरी मेळाव्यात सांगितले.

 

आमदार विजय औटी यांच्या ६१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित मेळाव्यासाठी ठाकरे पारनेरला आले होते. ते म्हणाले, मेमध्ये केंद्र सरकारला चार वर्षे पूर्ण होतील, पण अजून कुठले तरी काम केंद्राने केले आहे का? ज्या घोषणा केल्या होत्या, त्या पूर्ण केल्या नाहीत. जनतेला फक्त अच्छे दिनचे स्वप्न दाखवले. शेतकऱ्यांची वाट लावली. जिल्हा बँकेला टाळे लावले. आता हे चालणार नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्यांना आम्ही त्यांची जागा दाखवून देऊ. आमदार औटी म्हणाले, मातोश्री व शिवसेना आमचे कुटुंब आहे. उद्धव ठाकरे माझ्या वाढदिवसासाठी पारनेरला आले, यावर माझाच विश्वास बसत नाही. औटी यांच्या अभीष्टचिंतनासाठी संपर्कप्रमुख भाऊ कोरेगावकर, जिल्हा दक्षिणप्रमुख शशिकांत गाडे, उपनेते अनिल राठोड, जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले, नगरच्या महापौर सुरेखा कदम, जि. प. सदस्य काशिनाथ दाते, उपजिल्हा प्रमुख रामदास भोसले, तालुकाप्रमुख नीलेश लंके, माजी सभापती गणेश शेळके, अशोक कटारिया, बंडू रोहकले, अनिकेत औटी यांच्यासह जिल्ह्यातील शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

बातम्या आणखी आहेत...