आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नगर: संघटनमंत्र्यांनी पुन्हा शिकवला ‘पार्टी विथ डिफरन्स’चा धडा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर - संघटनमंत्र्यांची जबाबदारी काय असते,  हे सांगत संघटनमंत्र्यांच्या कधीच  पाया पडू नका, त्यांचा सत्कार करु नका, त्यांना साहेब म्हणू नका, असा सल्ला भाजपचे नूतन प्रदेश संघटनमंत्री िवजय पुराणिक यांनी रविवारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना दिला. संघटनमंत्री झाल्यानंतर पुराणिक यांनी पहिल्याच बैठकीत नगर जिल्ह्यातील पक्ष संघटनेचा आढावा घेत पदाधिकारी व कार्यकर्त्यांसाठी  पुन्हा  ‘पार्टी विथ डिफरन्स’चा धडा िदला.


नगर शहरातील कोहिनूर मंगल कार्यालयात नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातील भाजपचे अधिकृत उमेदवार अनिकेत पाटील यांची आढावा बैठक रविवारी भाजपचे नूतन संघटनमंत्री पुराणिक यांच्या उपस्थितीत झाली. बैठकीला जिल्ह्यातील भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले वगळता, पालकमंत्री राम शिंदे,  खासदार दिलीप गांधी, आमदार मोनिका राजळे, आमदार स्नेहलता कोल्हे,आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह सर्व पदाधिकारी हजर होते. तीन आमदार, एक कॅबिनेट मंत्री व एक खासदार, एक माजी खासदार, एक माजी आमदार या दिग्गजांच्या उपस्थित झालेल्या बैठकीला पदाधिकाऱ्यांची उपस्थिती लाजिरवाणी होती. बैठकीत समारोपाचे भाषण  पुराणिक यांचे झाले.  जिल्ह्यातील शहर व ग्रामीण जिल्हाध्यक्षांनी जिल्ह्यात किती बूथ आहेत, याची माहिती देण्याचे सांगितल्यानंतर शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांनी उभे राहून शहरात चार मंडल, २६५ बूथ व १६५ बूथची रचना पूर्ण झाल्याचे सांगितले.

बातम्या आणखी आहेत...