आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युरोप अभ्यास दौऱ्यातील आमदार शिष्टमंडळाची 'युनो'ला भेट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली युरोप अभ्यास दौऱ्यावर गेलेल्या आमदारांच्या शिष्टमंडळाने युनोला भेट दिली. आंतरराष्ट्रीय पातळीवरील सर्वोच्च संस्था असलेल्या आणि जगात शांतता, सलोखा व समन्वय राखणाऱ्या युनोच्या कामकाजाची या शिष्टमंडळाने माहिती घेतली. 


हे शिष्टमंडळ सध्या विविध राष्ट्रांना भेटी देत संसदीय कार्यप्रणालीचा अभ्यास करत आहे. दुसऱ्या महायुध्दानंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता नांदावी, दोन राष्ट्रांमध्ये समन्वय वाढावा यासाठी काम करणाऱ्या संयुक्त राष्ट्र संघाच्या मुख्यालयाला (युनो) या शिष्टमंडळाने भेट दिली. युनोचे डायरेक्टर जनरल मायकेल मोल्लर यांनी त्यांचे स्वागत केले. 


आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय हवामान संस्था, आंतरराष्ट्रीय वैद्यकीय संपदा, तसेच संयुक्त राष्ट्र संघाकडून मानवी विकास निर्देशांक वाढवण्यासाठी सुरू असलेल्या विविध उपाय आणि प्रयत्नांची माहिती शिष्टमंडळाने घेतली. 


गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य अनुकूल 
आमदार थोरात यांनी महाराष्ट्राची माहिती देत उद्योगजगतातील विविध शिखर संघटनांना महाराष्ट्रात येण्यासाठी निमंत्रण दिले. देशातील समृध्द लोकशाहीची रचना, राज्यघटना, नागरिकांचे मूलभूत अधिकार, कर्तव्य या विषयी त्यांनी माहिती देत राज्य गुंतवणुकीसाठी अनुकूल असल्याचे स्पष्ट केले. आमदार थोरात यांच्या आवाहनास प्रतिसाद देत मोल्लर यांनी निश्चित योगदान देण्याचे आश्वासन दिले. 

बातम्या आणखी आहेत...