आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहमदनगर: ग्रामसभा सुरू असताना विषप्राशन करून महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अहमदनगर- सातबारावरुन परस्पर नाव कमी केल्याच्या कारणामुळे भर ग्रामसभेत महिलेने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. छाया जरे असे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या महिलेचे नाव आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, अहमदनगर जिल्ह्यातील नगरदेवळे ग्रामपंचायतीमध्ये ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. सातबारावरून परस्पर नाव कमी केल्याच्या करणावरून सभेदरम्यान       छाया जरे यांनीविषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेनंतर जरे यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

 

छाया जरे यांचे राहते घर त्यांच्या आणि पतीच्या नावावर होते. परंतु, गेल्या महिन्यात पतीने ग्रामसेवक आणि सरपंचाच्या मदतीने आर्थिक व्यावहार करून घाराच्या नोंदीतून छाया यांचे नाव कमी केले. या संबंधीची तक्रार छाया जरे यांनी जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे केली होती. परंतु, त्यांनी याची दखल घेतली नाही. यावरून चिडलेल्या छाया जरे यांनी भर ग्रामसभेत गोधळ घालत ग्रामसेवकाच्या अंगावर शाई फेकली आणि विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला.

बातम्या आणखी आहेत...