आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगी असल्याचा संकोच नाही, तर अभिमान बाळगा- चैताली काळे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोपरगाव- महिलांनी प्रत्येक क्षेत्रात क्षमता सिद्ध केली. मातृत्व, कर्तृत्व व नेतृत्व या गुणांमुळे वेगळे अस्तित्व महिलांनी निर्माण केले. आजची स्त्री कुटुंबापुरतीच मर्यादित न राहता सामाजिक, शैक्षणिक, राजकीय क्षेत्रातही यशस्वीपणे कार्य करत आहे. मुलगी असल्याचा संकोच नाही, तर अभिमान बाळगा, असे जिल्हा बँकेच्या संचालिका चैताली काळे यांनी सांगितले. विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्टच्या आत्मा मालिक शैक्षणिक संकुलात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात काळे बोलत होत्या.

 

यावेळी पं. स. सभापती अनसूया होन, सरपंच अलका लोंढे, संत प्रभावती माई, संत शांतीमाई, संत ध्यानी माई आश्रमाचे कोषाध्यक्ष विठ्ठल होन, सरचिटणीस हनुमंत होन, विश्वस्त प्रकाश भट, वसंत आव्हाड, प्रकाश गिरमे, बाळासाहेब गोर्डे, चंद्रकला लोंढे, प्राचार्य निरंजन डांगे, माणिक जाधव, सुधाकर मलिक, संदीप गायकवाड, नितीन सोनवणे आदी उपस्थित होते. काळे यांनी आत्मा मालिक शैक्षणिक संकुलास वेंडिंग मशीन दिले. होन म्हणाल्या, जशी प्रत्येक यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, तसेच यशस्वी स्त्रीच्या पाठीमागे पुरुषाची खंबीर साथ असते. मला पतीचा पाठिंबा असल्यानेच मी राजकारणात आले. 

 

संकुलातील विविध विभागात भरीव कामगिरी करणाऱ्या महिलांचा आत्मा मालिक तेजस्विनी पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. मानकरी पुढीलप्रमाणे - ज्योती रेड्डी, नंदीनी वक्ते, काकडे मिनाक्षी, चित्रा भुजाडे, शेटे नयना, लोंढे तृप्ती, देठे आशा, खोजे शकुंतला, नरवडे मीना, जाधव माई, बोजगे सोनाली, स्नेहा कुलकर्णी, वैशाली खालकर, शीतल पालवे, पटेल मीरा, झनान विजया, जमधडे माधुरी, सुरूची चव्हाण, विमल काळे, शोभा गायकवाड, ज्योती राशनकर, रंजना छजलानी, सुभद्रा गायकवाड, शोभा वाघ, शारदा भागवत, अर्चना शिवंदे. 

ओम गुरुदेव माध्यमिक गुरुकुलाच्या विद्यार्थिनींनी 'स्त्री जन्माची कहाणी' नृत्याविष्कार सादर केला. सूत्रसंचालन राजश्री पिंगळे यांनी केले, तर आभार मीरा पटेल यांनी मानले. या कार्यक्रमासाठी योगेश गायके, शेखर भास्कर, संजय बैरागी, सुरेश शिंदे यांनी परिश्रम घेतले. 
 

बातम्या आणखी आहेत...