आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनैतिक संबंधातून तरुणाचा गळा आवळून खून, धरणात फेकला मृतदेह

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टाकळी ढोकेश्वर- तालुक्यातील पळशी येथील माळवाडी येथील रहिवासी असलेल्या २९ वर्षांच्या विवाहित तरुणाचा अनैतिक संबंधातून गळा आवळून खून झाला. ही घटना १२ दिवसांनी उघड झाली. या तरुणाचे नाव सुभाष बाळू दुधवडे असून त्याचा मृतदेह प्लास्टिकच्या पिशवीत बांधून काळू धरणात टाकण्यात आला होता. सुभाषला आई, वडील, दोन पत्नी, तीन मुले, एक मुलगी अाहे. अन्यत्र अनैतिक संबंध असल्याने त्याचा काटा काढण्यात आला.

 

पारनेर पोलिसांनी मोबाइल काॅल डिटेलच्या आधारे अशोक मोतीराम चिकणे (वय २९) व नाना मोहन बर्डे (२८, माळवाडी) यांना रविवारी रात्री अटक केली. पोलिस उपअधीक्षक मनीष कलवानिया, निरीक्षक हनुमंतराव गाडे, सहायक पोलिस निरीक्षक रामेश्वर घुगे, संजय मातोंडकर, पवार, महेश आव्हाड, भिंगारदिवे यांनी ४८ तासांत या प्रकरणाचा छडा लावला. 

सुभाष बाळू दुधवडे हा २८ फेब्रुवारीला घरात काही न सांगता निघून गेला. नातेवाईकांकडे शोध घेतला, पण तो सापडला नाही. ७ मार्चला त्याचा भाऊ नामदेव बाळू दुधवडे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवली. १० मार्चला गाजदीपूर शिवारातील काळू धरणाच्या कपारीमध्ये प्लास्टिकच्या पिशवीत काहीतरी तरंगत आहे, अशी खबर पोलिस पाटील भाऊसाहेब सातकर यांनी टाकळी ढोकेश्वर पोलिस दूरक्षेत्रात दिली. प्लास्टिकच्या गोणीत तारेने बांधलेल्या अवस्थेत कुजलेला मृतदेह मिळाला. कपड्यांच्या वर्णनावरून मृतदेह सुभाष दुधवडे याचाच असल्याचे निष्पन्न झाले. 

 

गोणीचे तोंड तारेने बांधून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह पाण्यात टाकून दिला होता. मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्याला पाठवण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक हनुमंत गाडे, सहायक फौजदार भोसले, कॉन्स्टेबल शेळके, साळवे, पवार करत आहेत. या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग आहे का, या दृष्टीने पोलिस तपास करत आहेत. 

 

३ वर्षांपासून खुनाचा कट 
आरोपी अशोक मोतिराम चिकणे हा नाना मोहन बर्डे याच्या मदतीने सुभाष बाळू दुधवडे याचा खून करण्यासाठी गेल्या तीन वर्षांपासून कट आखत असला असल्याची माहिती पोलिस तपासात पुढे आली. मोबाइल काॅलच्या आधारे पोलिसांनी या खुनाचे रहस्य उलगडले. या कामी काॅन्स्टेबल महेश आव्हाड व पप्पू भिंगारदिवे यांनी विशेष कामगिरी बजावली असल्याचे पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी सांगितले. 

 

४८ तासात खुन्यांचा शोध 
प्लास्टिकच्या पिशवीतील मृतदेह सुभाषचाच असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिस उपअधीक्षक मनीष कलवानिया व निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी टाकळी, माळवाडी परिसरात शनिवारी व रविवारी दोन दिवस तळ ठोकून या प्रकरणाचा उलगडा केला. अनैतिक संबंधातून हा खून केल्याची कबुली अशोक मोतिराम चिकणे व नाना मोहन बर्डे या आरोपींनी दिली असल्याचे पोलिस निरीक्षक हनुमंतराव गाडे यांनी सांगितले. 

 

 

बातम्या आणखी आहेत...