आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जमाफी: नगर जिल्ह्यातील पावणे दाेन लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये 523 कोटी वर्ग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नगर - छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेर्तंगत नगर जिल्ह्यातील १ कोटी ८३ हजार ८९४ पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात शुक्रवारी (१९ जानेवारी) अखेरपर्यंत ५२३ कोटी ३ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे व जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी शुक्रवारी दिली.

 

कर्जमाफी योजने अंतर्गत जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यात ५२३ कोटी ३ लाख रुपयांची रक्कम जमा झाली आहे.मात्र राज्य सरकारच्या महाऑनलाईन पोर्टलमार्फत जिल्ह्यातील एकूण ९० हजार ५५८ शेतकरी सभासदांच्या खात्याची माहिती बँकेच्या खात्याशी जुळत नसल्याने ती यादी बँकांना प्राप्त झाली आहे. अशा प्रकारच्या याद्या सर्व संबधित बँक शाखा स्तरावर प्रसिध्द करण्यात आल्या असून, संबधित विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या गटसचिवांकडे उपलब्ध करुन दिल्या आहेत. यादीत नाव असलेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील अचूक माहिती घेऊन संबधित बँकेच्या शाखाधिकाऱ्यांशी गटसचिवामार्फत तातडीने संपर्क साधावा आणि त्रुटींची पुर्तता करुन घ्यावी, असे आवाहन रावसाहेब वर्पे व अनिलकुमार दाबशेडे यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेर्तंगत बँकेशी संलग्न असणाऱ्या प्राथमिक विविध कार्यकारी सेवा सोसायची संस्थेच्या सभासदांना वेळोवेळी कर्जमाफीच्या रकमा उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.मात्र, महाऑनलाईन पोर्टलकडून बँकेच्या माहितीशी जुळत नसलेल्या याद्या प्राप्त झाल्या आहेत. या याद्यांच्या माहितीतील तफावतीमुळे ताळमेळ घालणे शक्य होत नसल्याने संबंधित यादीत नाव असणाऱ्या शेतकरी खातेदारांनी तातडीने आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करुन ती बँकेत जमा करावीत, जेणेकरुन एकही पात्र शेतकरी या योजनेपासून वंचित राहणार नाही, असे वर्पे व दाबशेडे यांनी म्हटले आहे.

 

अॅनमॅच अर्जदारांची संख्या
अकोले ८ हजार ५३८, जामखेड ४ हजार १५३, कर्जत ५ हजार ५५४, कोपरगाव २ हजार २२५, नगर ८ हजार ९९८, नेवासे २ हजार२२९, पारनेर ११ हजार ४४१, पाथर्डी ३ हजार ९४१, राहाता ४ हजार ४४, राहुरी ५ हजार ६६४, संगमनेर ८ हजार ८०२, शेवगाव ६ हजार ५८४, श्रीगोंदे १५ हजार ९३६, श्रीरामपूर २ हजार ३५८ अशी ९० हजार ५५८ अॅनमॅच अर्जदारांची संख्या आहे.

 

शहानिशा केल्यानंतर पोर्टलवर यादी प्रसिद्ध
अनमॅच यादीबाबत संबधित बँक शाखाधिकारी हे गटसचिव आणि नियुक्त शाखानिहाय लेखापरिक्षक (सहकारी संस्था) यांच्या मदतीने विकास संस्थेच्या व बँकेच्या अभिलेख्यावरुन माहितीशी शहानिशा करणार आहे. शहानिशानंतर यादीतील त्रुटी दुर केल्यानंतर ती यादी पोर्टलवर अपलोड केली जाणार आहे. - रावसाहेब वर्पे, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा बँक

 

तालुकास्तरीय समिती निर्णय घेणार
बँकांनी पोर्टलवर प्रसिध्द केलेली माहिती विचारात घेऊन तालुक्यास्तरीय समिती संबंधित शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र आहे किंवा नाही याबाबतचा निर्णय घेणार आहेत. त्यामुळे या अनमॅच यादीत नाव असणाऱ्या शेतकऱ्यांनी तातडीने माहिती आवश्यक त्या कागदपत्रांसह बँकेकडे सादर करावी.
- अनिलकुमार दाबशेडे, जिल्हा उपनिबंधक.

बातम्या आणखी आहेत...