आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानगर - भारत विशिष्ट पहचान प्राधिकरण यांच्या सूचनेनुसार बँकनिहाय आढावा घेण्यात आली असता अनेक बँकांमध्ये आधार केंद्र अद्याप चालू झाले नसल्याचे दिसून आले आहे. तसेच ज्या बँकांमध्ये आधार नोंदणी केंद्र चालू आहे. त्या बँकामध्ये आधार नोंदणीचे प्रमाण फारच कमी आहे. केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार सर्व बँकांनी खातेदारांचे खाते क्रमांक आधार क्रमांकाशी संलग्न करण्याचे काम ३१ मार्चपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अभय महाजन यांनी नुकत्याच दिल्या.
जिल्ह्यातील सर्व राष्ट्रीयकृत, खासगी बँका व सहकारी बँकांचे प्रतिनिधी व आधार केंद्रचालक यांची संयुक्त बैठक जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी भारत विशिष्ट पहचान प्राधिकरणाचे प्रतिनिधी ब्रिजेश शर्मा, आधार प्रकल्पाचे जिल्ह्याचे नोडल अधिकारी तथा जिल्हा निवडणूक शाखेचे उपजिल्हाधिकारी अरुण आनंदकर, तहसीलदार सुधीर पाटील, तहसीलदार (संजय गांधी योजना शाखा) सदाशिव शेलार, नायब तहसीलदार प्रशांत गोसावी, सर्व बँकांचे प्रतिनिधी व आधार केंद्र चालक आदी उपस्थित होते. जिल्हाधिकारी महाजन म्हणाले, सर्व राष्ट्रीयकृत, खासगी बँका व सहकारी बँकांनी सर्व खातेदारांचे खाते क्रमांक आधार क्रमांकाशी मुदतीत संलग्न करावे. तसेच शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांची माहिती सर्व बँकांकडे अद्ययावत असणे आवश्यक आहे. या बैठकीत सामाजिक अर्थसाहाय्याच्या विविध योजना आणि त्यांचे बँक खात्यांशी आधार लिंकिंग यांचाही सविस्तर आढावा घेण्यात आला. आधार नोंदणीबाबत उपस्थितांनी शंका उपस्थित करण्यात आल्या. तसेच प्रथमतः केली जाणारी आधार नोंदणी पूर्णतः नि:शुल्क असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे, असेही यावेळी अरुण आनंदकर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.