आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालिकेवर अत्याचार करणाऱ्यांना फाशीची शिक्षा देण्याची मागणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

संगमनेर- धुळे जिल्ह्यातील दोंडाईच्या येथे पाच वर्षांच्या बालिकेवर अत्याचाराची घटना घडली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेचा राज्यभरात सर्वत्र निषेध केला जात अाहे. संगमनेरमधील तेली समाजाच्या वतीनेही या घटनेचा निषेध करण्यात आला. आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी प्रांताधिकारी, तहसीलदार, पोलिस उपअधीक्षक आणि पोलिस निरीक्षकांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली. 


दोंडाईच्या एका शिक्षण संस्थेत हा प्रकार घडला. या घटनेला संबंधित संस्थाचालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी जबाबदार आहेत. त्यांनी अत्याचारित बालिकेच्या कुटंुबावर दबाव आणला. घडलेली घटना घृणास्पद असून माणुसकीला काळिमा फासणारी आहे. हा खटला विशेष जलदगती न्यायालयात चालवला जावा. आरोपींना कठोर शिक्षा न झाल्यास अशा घटना वारंवार घडतील. या प्रकारातील आरोपींना शासन झाले नाही, तर राज्यभर तेली समाजाच्या वतीने माेर्चे, आंदोलने केली जातील, निवेदनात म्हटले आहे. तेली समाजाचे अध्यक्ष श्याम कर्पे, दत्तात्रेय पाबळकर, सागर पन्हाळे, गोरक्ष कर्पे, गुलाब वालझाडे, संजय भोत, नानासाहेब भोत, बाळकृष्ण कर्पे, यशवंत शेलार, अशोक वालझाडे, महेश शिंदे, श्याम पन्हाळे, प्रदीप कर्पे, विशाल वालझाडे, सोमनाथ पाबळकर, मंगशे वालझाडे, योगेश क्षीरसागर आदींसह समाजबांधव निवेदन देताना उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...