आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऊसतोडणी कामगारांचे नेते व माजी आमदार दगडू बडे यांचे निधन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाथर्डी- ऊसतोडणी कामगारांचे नेते व माजी आमदार दगडू पाराजी बडे (८०) यांचे शुक्रवारी सायंकाळी निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी शीलाबाई, मुले कल्याण व धनंजय आणि चार मुली असा परिवार आहे. ऊसतोडणी कामगारांना संघटित करण्याची सुरुवात १९८० मध्ये बडे व माजी मंत्री बबन ढाकणे यांनी केले. 


पाथर्डी मतदारसंघात भाजपचे वाढवण्याचे काम बडे यांनी केले. उपेक्षित असणारा ऊसतोडणी कामगारांचे संघटन करून त्यांच्या न्याय हक्कासाठी संघर्ष करण्याचे काम केले. वडगाव येथील बेलपारा मध्यम प्रकल्पात जमिनी गेलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून नुकसान भरपाई मिळावी यासाठी रस्त्यावर उतरून संघर्ष केला. बडे यांना शुक्रवारी दुपारी छातीमध्ये दुखू लागल्याने नगर येथे खासगी रुग्णालयात दाखल केल,े तेथे उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मावळली. गेल्या सहा महिन्यांपासून ते आजारी होते. चिंचपूर पांगुळचे सरपंच धनंजय बडे व खंडपीठातील वकील असणारे कल्याण बडे हे त्यांचे पुत्र होत.

बातम्या आणखी आहेत...